Saturday, July 25, 2026
Homeगुन्हाजळगावात 'झिरो फेटॅलिटी' मोहिमेचा धडाका; १७८ वाहनचालकांवर कारवाई, ₹१.७१ लाखांचा दंड !

जळगावात ‘झिरो फेटॅलिटी’ मोहिमेचा धडाका; १७८ वाहनचालकांवर कारवाई, ₹१.७१ लाखांचा दंड !

जळगावात ‘झिरो फेटॅलिटी’ मोहिमेचा धडाका; १७८ वाहनचालकांवर कारवाई, ₹१.७१ लाखांचा दंड !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे या उद्देशाने शहर वाहतूक शाखेतर्फे २३ जुलै २०२६ रोजी विशेष ‘झिरो फेटॅलिटी’ मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध महाविद्यालय परिसर तसेच आकाशवाणी चौकात धडक तपासणी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ₹१ लाख ७१ हजार ५०० रकमेचे ई-चलान करण्यात आले, तर घटनास्थळी ₹४ हजार ५०० इतका रोख दंडही वसूल करण्यात आला.

या विशेष मोहिमेत वाहतूक पोलिसांनी विना परवाना वाहन चालविणारे, अल्पवयीन चालक, सीटबेल्टचा वापर न करणारे, ट्रिपल सीट दुचाकीस्वार, हेल्मेटविना वाहन चालविणारे तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले.

कारवाईचा तपशील

– विना परवाना वाहन चालविणारे – ५९
– सीटबेल्टचा वापर न करणारे – ३३
– अल्पवयीन चालक – ८
– ट्रिपल सीट दुचाकी चालविणारे – ११
– अवैध प्रवासी वाहतूक – ५
– हेल्मेट न वापरणारे – ४
– मद्यप्राशन करून वाहन चालविणारे – २
– इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन – ६१

वाहतूक शाखेने नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये, तसेच वाहन चालविताना हेल्मेट आणि सीटबेल्टचा अनिवार्य वापर करावा, असे सांगितले आहे. अपघातमुक्त आणि सुरक्षित जळगाव घडविण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या