Sunday, May 10, 2026
Homeजळगावबस वाहकांच्या मनमानीमुळे छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या वयोवृद्धांना त्रास . बसचा अधिकृत...

बस वाहकांच्या मनमानीमुळे छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या वयोवृद्धांना त्रास . बसचा अधिकृत थांबा असून सुद्धा बस थांबत नाहीत . 

बस वाहकांच्या मनमानीमुळे छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या वयोवृद्धांना त्रास . बसचा अधिकृत थांबा असून सुद्धा बस थांबत नाहीत .

 

वरणगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 :येथिल छत्रपती शिवाजी महाराज नगर जवळ अधिकृत बसथांबा असुन सुद्धा येथे बस न थांबवल्यामुळे वृद्ध जोडप्यास भर उन्हात बसस्टँड पासुन अर्धा कि .मी. पर्यंत उलट पायी यावे लागले .

याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ८ मे रोजी मुक्ताईनगर आवाराची बस क्र . एम .एच.१४ बी .टी. २२४७ हि मालेगाव हुन मुक्ताईनगरकडे येत असतांना दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुकटी ता . धुळे येथून वयोवृद्ध जोडपे वरणगावला येणेसाठी बसले . बस वरणगावला आल्यावर चालकासह वाहक डि .एन. जाधव यांना छत्रपती शिवाजी महाराज नगर जवळ बस. थांबवण्याची विनंती केली असता त्यांनी बस न थांबवता अरेरावीची भाषा करून बस पुढे तिरंगा सर्कल पर्यंत वेगाने दामटली .व तुम्हाला काय करायचे ते करा अशी उद्धट भाषा वापरल्यामुळे प्रवाशांसमोर वृद्धाचा अपमान केला . अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज नगर जवळ अधिकृत बसथांबा असुन सुद्धा काही उर्मट कर्मचारी येथे बस थांबवत नाही त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे .सदर चा हा प्रकार दररोज सुरु असुन मुक्ताईनगर आगार प्रमुखांनी याकडे लक्ष घालून वाहक व चालक यांची चौकशी करून प्रवाशांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या