१५ मे रोजी वरणगाव येथे महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन .

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी
शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर तहसील कार्यालय भुसावळ व वरणगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 15 मे 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता वरणगाव नगरपरिषद सभागृह वरणगाव येथे आयोजित केले आहे.
शिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विविध प्रकारचे दाखले, महिला व बालकल्याण विभागाशी संबंधित योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजनेबाबत मार्गदर्शन, दुय्यम निबंधक कार्यालया मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, नगरपरिषद मार्फत दिले जाणारे विविध दाखले ,आयुष्यमान भारत कार्डवाटप, कृषी योजनांची माहिती या सर्व योजना संबंधित माहिती आणि सेवा नागरिकांना एका छताखाली उपलब्ध होणार आहे. कमी वेळेत नागरीकांनी शासकिय दाखले मिळावे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे .
नागरिकांचे आणि शेतकरी बांधवांचे अर्ज देखील या शिबिरात स्वीकारले जातील तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती नीता लबडे तहसीलदार भुसावळ यांनी केले आहे .

