प्रशासकीय दृष्ट्या तत्काळ बदली करणे बाबत सह आयुक्त यांनी घेतली तक्रारीची दखल.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१३
प्रशासकीय दृष्ट्या तत्काळ बदली करणे बाबत यावल नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचारी प्रभारी मुकादम सौ.कल्पना घारू यांनी दि.२३ एप्रिल २०२६ रोजी केलेल्या तक्रारीची दखल जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद शाखेचे सह आयुक्त जनार्दन पवार यांनी दखल घेऊन यावल मुख्याधिकाऱ्यांना नियोमोचित् कार्यवाही करण्याचे पत्र दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद शाखेचे सह आयुक्त यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की सौ.कल्पना बबलू घारू, (प्रभारी मुकादम) स्वच्छता कर्मचारी आरोग्य विभाग, यावल नगरपरिषद यावल यांनी त्यांची प्रशासकीय दृष्ट्या तात्काळ बदली करणेबाबत अर्ज दाखल केलेला आहे व त्याची एक प्रत इकडिल कार्यालयास सादर केलेली आहे.
अर्जाची प्रत यासोबत जोडण्यात येत आहे.तरी विषयांकित प्रकरणी आपल्या स्तरावरुन शाहनिशा करुन नियमोचित कार्यवाही करावी व अर्जदार यांना परस्पर कळविण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा.तसेच सदर पत्राची प्रत अर्जदार यांना आपल्या स्तरावरुन बजावण्यात यावी.असे कळविल्याने यावल नगरपरिषद मुख्याधिकारी काय कार्यवाही करतात याकडे तक्रारदार यांचे लक्ष लागून आहे.

