पोलीसांचे DG लोनसाठी { गृहकर्ज अग्रिम } अखेर 1768.08 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आंदोलनाला आले यश !
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१३
पोलीसांना घरे बांधण्यासाठी सन २०२३ पासून प्रलंबित असलेले DG लोन { गृहकर्ज अग्रिम } अखेर १७६८.०८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या बाबतचा शासन निर्णय दि.१२ २०२६ रोजी देण्यात आला.
या बाबत अधिक माहिती देताना प्रमोद वाघमारे यांनी सांगितले आहे की पोलीसांना स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलातून सुमारे ४ ते ५ हजार पोलीस कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यांनी सन २०२३ रोजी DG लोन घेण्यासाठी अर्ज दाखल केले होते , परंतु दोन ते अडीच वर्षांचा कालावधी होऊनही DG लोन मंजूर करण्यात येत नव्हते , त्यामुळे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे तसेच त्यांचे जिल्हाध्यक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकारी / स्थानिक आमदार / पालकमंत्री यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब त्याच प्रमाणे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्व.अजित { दादा } पवार साहेब त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदने देऊन सतत पाठपुरावा केला होता.तसेच डिसेंबर २०२५ मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर भव्य मोर्चा काढून गृहराज्यमंत्री पंकज भोयर साहेब यांची भेट घेऊन त्यांना देखील निवेदन दिले होते.त्यावेळेस पंकज भोयर साहेबांनी राज्याच्या अप्पर गृहसचिव राधिका रस्तोगी मॅडम यांच्या सोबत पोलीस बॉईज असोसिएशनच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली होती.अखेर पोलीस बॉईज असोसिएशनच्या या आंदोलनाला यश आले असून महायुती सरकारने DG लोन मंजूर केले असून त्यासाठी १७६८.०८ कोटी रुपये इतका निधी मंजूर केला असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी सांगितले आहे.

