बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण महिला अपराध संघटनकडून पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना निवेदन!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन चिंमुरडीवर १२ आणि १३ ऑगस्ट रोजी शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेने समाजातील प्रत्येक घटकाचे मन सुन्न झाले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एंव महिला अपराध संघटन नियंत्रण नवी दिल्ली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका अध्यक्ष विनोद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना शनिवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन चिमुरुडीवर शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने 12 आणि 13 रोजी लैंगिक अत्याचार केला.यातील एकीच्या पालकांनी तिला खाजगी रुग्णालयात नेले असता तपासणीनंतर तिच्या प्रायव्हेट भागाला दुखापत झाल्याची बाब समोर आली. १६ रोजी पालक अहवाल घेऊन शाळेत गेले मात्र शाळेने सायकल मुळे जखम झाली असावी किंवा शाळेबाहेर काही घडले असावे असे निरर्थक दावे करुन अहवाल फेटाळून लावला. याबाबतची माहिती पालकांनी दिली. १७ ऑगस्टला बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पालक तक्रार देण्यासाठी गेले असता पिडीतेच्या पालकांना पोलिसांनी तब्बल 12 तासापेक्षा जास्त वेळ बसून ठेवले .या संताप जनक घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील आरोपी नराधमाला अटक करण्यात आली आहे. तर संबंधित पोलिसांना निलंबित केले आहे. भविष्यात अशी घटना घडू नये आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष विनोद शर्मा तालुका जनसंपर्क अधिकारी अखिलेश धिमान शहराध्यक्ष जयप्रकाश शुक्ला , तालुका महिला अध्यक्ष सपना शिंदे , तालुका महिला जनसंपर्क अधिकारी सुरेखा तायडे सुनीता पांडे ,कविता सोनवणे, शिरीष अग्रवाल , विजय सावदेकर, आकाश खांडे यांच्या सह्या आहेत.