सामाजिक आरोग्य व न्यायाच्या दृष्टीने प्रथमच झोपेची खाट टाकून अनोखे आंदोलनाचा दिला इशारा!
यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – सामाजिक आरोग्य व न्यायाच्या दृष्टीने तात्काळ कारवाई होण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या समोर झोपेची खाट टाकून अनोखे असे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्याने संबंधित शासकीय यंत्रणेची झोप उडविल्याचा किस्सा समोर आला आहे.
जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे भुसावळ येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मी सर्वे क्रमांक 115/1/अ भूसावळ हद्दिबाहेरिल श्रद्धा नगर संत गजानन महाराज देवस्थान येथील रहिवासी असून त्या ठिकाणी झालेल्या अतिक्रमण, सिमेंट गोडाऊन,संडास व बाथरूम तसेच भव्य असे पत्र्याच्या शेड व गुरे-ढोरे ठेवण्यासाठी उभारलेल्या गोठ्याबाबत संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार व निवेदन दिले आहे.
तसेच या संदर्भात आवश्यक ती कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही दिलेला आहे.जर का कुठलीही करवाई तत्काल नाही झाली तर तीव्र पद्धतीने प्रान्त कार्यालय समोर झोपेची खाट /खटिया टाकुन आंदोलन केले जाईल आणि यास प्रशासन जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी असे कळविलेले असताना संबंधित यंत्रणेने आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही.दरम्यान,परिसरातील अस्वच्छता आणि
अस्वास्थ्यकारक परिस्थितीमुळे मला त्वचारोगाचा त्रास सुरू झाला असून मि एकटा पेशंट नसून अजुन २ पेशंट आहेत एखाद्या कीटक चावल्यामुळे संसर्ग वाढल्याची शक्यता वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यक्त करण्यात आली आहे.मला वेदना व त्रास अत्यंत असह्य स्वरूपाचा आहे.
माझी मागणी ही कोणत्याही व्यक्तीविरुद्ध वैयक्तिक द्वेषातून नसून, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि कायदेशीर हक्कांच्या रक्षणासाठी आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी व जबाबदार घटकांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन वस्तुस्थितीची पाहणी करून कायद्यानुसार कारवाई करावी ही ठाम अपेक्षा आहे.
जर वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक किंवा सामाजिक परिणामांची जबाबदारी कोणावर येईल,याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. नागरिक म्हणून माझा उद्देश केवळ न्याय्य व पारदर्शक प्रशासन मिळावा हा आहे.सामाजिक हित, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी,हीच सर्व नागरिकांची व रहिवाशीयांची अपेक्षा आहे. अशी मागणी करीत शासनाने दखल न घेतल्यास भुसावळ प्रांत कार्यालयासमोर झोपेची खाट टाकून एक लक्षवेधी आंदोलन चिडले जाणार असल्याचा इशारा जगन्नाथ पाटील यांनी दिला आहे.