येथे मा.ना.श्री.गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात ३५ जणांचे उस्फुर्त रक्तदान.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१५
उन्हाळ्याच्या दिवसात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने संपूर्ण जिल्ह्यात व यावल तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात रक्ताची कमतरता भासते अनेक अपघातग्रस्त व प्रसुतीच्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही. उष्णतेने नागरिकही रक्तदानास धजावत नाही.अशा वेळी भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक जलसंपदा मंत्री *मा. ना.श्री. गिरीषभाऊ महाजन* यांच्या सारख्या सेवाभावी मंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावल येथील डॉ.कुंदन दादा फेगडे मित्रपरिवार च्या वतीने आई हॉस्पिटल भुसावळ रोड यावल येथे भव्य रक्तदान शिबिराचे* आयोजन केले होते.या समाजपयोगी उपक्रमात डॉ.कुंदनदादा फेगडे व डॉ.जागृती फेगडे मॅम सहभागी झाल्या त्यांच्यासह मूल्य अशा रक्तदानाच्या कार्यक्रमात *३५ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान* केले.याप्रसंगी भूषण फेगडे,राजेश महाजन,निर्मल चोपडे,व्यंकटेश बारी,मनोज बारी रितेश बारी,उज्वल कानडे,कोमल इंगळे,सागर इंगळे,राहुल झांबरे, चेतन कोळी,गजानन बारी,शुभम देशमुख,नितीन यादव,सनी बडगुजर,सतीश कोळी,अशोक कोळी,मनोज माळी,यांच्या सह मोठ्या संख्येने सहकारी मित्र परिवार उपस्थित होते.
रक्त संकलन* फैजपूर येथील
संत जगन्नाथ महाराज अंजाळेकर बहुउ्देशीय संस्था संचालित संजीवनी ब्लड सेंटरच्या तज्ञ टीमने केले यामुळे रक्तदानाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याची ही एक सुवर्ण संधी ठरली.

