साकेगाव ग्रामपंचायत कार्यालयात रामभरोसे..?
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायत कार्यालय कार्यालय वेळेत ग्रामस्थ गेले असता शुकशुकाट अधिकृत कर्मचारी होता की अनधिकृत व्यक्ती सोफ्यावर झोपलेला आढळून आल्याने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ग्रामस्थांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचा अत्यंत बेजबाबदार आणि धक्कादायक कारभार काल गुरुवार दिनांक १४ मे २०२६ रोजी समोर आला आहे. शासकीय नियमांनुसार कार्यालयीन वेळ सुरू असतानाही साकेगाव ग्रामपंचायत कार्यालयात पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला.
विशेष म्हणजे, कार्यालयात नागरिक आपल्या कामासाठी येत असताना त्यांना सेवा देण्याऐवजी तिथे उपस्थित असलेले कर्मचारी कि अनाधिकृत व्यक्ती चक्क सोफ्यावर झोपलेले आढळून आले.मिळालेल्या माहितीनुसार,सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास काही नागरिक आणि प्रतिनिधी काही महत्त्वाच्या कामासाठी साकेगाव ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते.शासकीय कामकाजाची वेळ असल्याने कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहायला पाहिजे परंतु मुख्य कार्यालयात प्रवेश करताच संपूर्ण आवारात शुकशुकाट होता.कार्यालयाची पाहणी केली असता, तिथे उपस्थित असलेला एक कर्मचारी कि अनधिकृत व्यक्ती चक्क सोफ्यावर झोपलेला आढळून आला.तर दुसरीकडे उपस्थित असलेला व्यक्ती हा कचरा वाहक होता.त्याची ड्युटी संपल्यामुळे तो तिथे विश्रांती घेत बसला होता.जेव्हा या सर्व प्रकाराबाबत तिथे विचारणा करण्यात आली, तेव्हा समाधानकारक उत्तर देण्याऐवजी चालढकल करण्यात आली.


