कार्यकारी अभियंता अहिरे यांच्या बंगल्यातील कूपनलिकेची चौकशी केव्हा होणार..?

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१५
तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव कार्यक्षेत्रातील जळगाव येथील बंगला नंबर ‘ ब ‘ – ४ ( कार्यकारी अभियंता अहिरे यांचे निवासस्थान असलेले ) आवारात कुपनलिका खोदण्यात आली आहे त्या कूपनलीकेची परवानगी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली आहे किंवा नाही..? याबाबतची चौकशी केव्हा होणार..? असा प्रश्न तक्रारदार नितीन रंधे यांनी उपस्थित केला आहे.
नितीन रंधे यांनी दि.७ एप्रिल २०२६ रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव कार्यकारी संचालक यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यक्षेत्रातील जळगाव येथे असलेले सरकारी बंगले त्यातील बंगला नंबर ‘ ब ‘ – ४ ( कार्यकारी अभियंता अहिरे ) यांचे निवासस्थान असलेल्या बंगल्याच्या परिसरात शासकीय पूर्व परवानगी न घेता ४५० ते ५०० फूट खोल कूपनलिका खोदली आहे. कुपनलिका खोदताना संबंधितांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रीतसर लेखी स्वरूपात परवानगी घेतली आहे किंवा नाही.? आणा घेतली नसल्यास चौकशी व्हावी अशी तक्रार केली होती. त्या तक्रार अर्जानुसार कोणतीही कार्यवाही न केल्याने तक्रारदार नितीन रंधे यांनी आज शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी लेखी पत्र देऊन तक्रार अर्जाची कार्यवाही झालेली दिसत नसल्याने चौकशी करावी असे लेखी पत्र दिले यानुसार तापी पाटबंधारे विकास महामंडळ संचालक आपल्या शासकीय कार्यालयीन यंत्रणे मार्फत चौकशी करणार आहे किंवा नाही.? याकडे तक्रारदार यांचे लक्ष लागून आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी झटकली जबाबदारी — जळगाव येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी दि.२४ एप्रिल २०२६ रोजी जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे की,या कार्यालयामार्फत कोणत्याही क्षेत्रात पाणी उपलब्ध होईल किंवा नाही व किती प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकते याबाबत तांत्रिक सर्वेक्षण करण्यात येऊन प्रमाणपत्र देण्यात येते सदर कामाशी संबंधित परवानगी व मंजुरी या विभागाकडून देण्यात येत नाही तसेच मंजुरी देण्याचे अधिकार या कार्यालयास नाहीत असे कळवून आपली जबाबदारी झटकली आहे.

