Friday, May 15, 2026
Homeजळगावजिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” संपन्न. 

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” संपन्न. 

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” संपन्न.

 

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 दि.१५

तालुक्यातील फैजपूर येथील खंडेराववाडीत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी जळगाव रोहन घुगे यांच्या उपस्थितीत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” आज शुक्रवार दि.१५ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 

या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच आमदार अमोलदादा जावळे, प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर,नगराध्यक्षा सौ. दामिनी सराफ व इतर मान्यवर यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी,तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबीरामध्ये देण्यात आलेले ठळक लाभ जिवंत सातबारा वाटप

एकूण वारस नोंदी : २३३

प्रातिनिधिक वाटप : २८

उत्पन्न दाखले वाटप – २१

शिधापत्रिका वाटप – ०६

जात प्रमाणपत्र वाटप – २४

तुकडा शेरा कमी करणे

तुकडा वाटप सातबारा- २१

अधिवास (Domicile) व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र – १८

विशेष अर्थसाहाय योजना लाभार्थी – ४५ इत्यादी लाभार्थींना लाभ मिळाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या