सहकार क्षेत्रातील गब्बर लाच खोर दीड लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला !
संपूर्ण समाजात आणि सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – दि.२० मे २०२६ रोजी उप निबंधक सह संस्था,जळगाव येथील ( यावल, भुसावळ, जामनेर येथे कार्यरत असलेले ) उप निबंधक जगदीश बाबुराव बारी, (सहकार खाते, वर्ग- १) यांनी प्रथम ५,००,०००/- मागणी करून तडजोडीअंती ३,००,००० /- रू. मागणी करून त्यापैकी पहीला हफ्ता जळगाव येथील बी.जे. मार्केट मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अर्बन को ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन कार्यालय १,५०,०००/- रू. आरोपी देविदास धनसिंग पाटील यांच्यामार्फत रंगे हात स्विकारल्याने त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयान्वये कारवाई करण्यात आली समाजात सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय सुरू झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की,यातील तक्रारदार यांचेवर अवैध सावकारी धंदा कारवाईच्या अनुषंगाने कारवाई झाली होती. सदरची सुनावणी ही उपनिबंधक,सहकारी संस्था,जळगाव तालुका, जळगाव येथे सुरू होती. तक्रारदार हे त्यांचे विरूध्द सुरू असलेल्या अवैध सावकारी चौकशी प्रकरणी विचारपुस करण्यासाठी व पुढील सुनावणीची तारीख विचारण्यासाठी उपनिबंधक, सहकारी संस्था,जळगाव या कार्यालयात गेले असता तेथील जगदिश बारी,उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव यांनी तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुध्द गुन्हा दाखल होवु नये,म्हणुन अवैध सावकारी बाबतचा चौकशी अहवाल अनुकुल पाठविण्यासाठी ५,००,००० /- रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.१८ मे २०२६ रोजी ला.प्र.वि.जळगाव घटकास तक्रार दिली होती.तक्रारदार यांच्या तक्रारी नुसार दि.१८ मे २०२६ रोजी पंचासमक्ष उपनिबंधक,
सहकारी संस्था, जळगाव तालुका जळगाव येथे लाच मागणी पडताळणी कार्यवाही आजमावली असता यातील आलोसे जगदीश बारी यांनी तक्रारदार यांचेविरुध्द अवैध सावकारी बाबतचा अहवाल अनुकुल पाठविण्यासाठी प्रथम ५,००,०००/- रूपयांची मागणी करून तडजोडीअंती ३,००,०००/- रू. लाचेची मागणी केली. तसेच पडताळणी दरम्यान आलासे क्र. ०१ हे बोलले की, तुम्ही मागच्या प्रकरणाच्या वेळेस वकील लावला म्हणुन आमचे खुप मोठे नुकसान केले,म्हणुन नकारात्मक अहवाल दिला होता.परंतु आता अनुकुल अहवाल पाठवितो,असे सांगुन लाचेच्या मागणीपैकी पहीला हप्ता १,५०,०००/- रू. हा आरोपी नामे देविदास पाटील यांचेकडे दि.२० मे २०२६ रोजी देण्यास सांगितले.त्याप्रमाणे आज बुधवार दि.२० रोजी सापळा कारवाई आजमावली असता आलोसे जगदीश बारी यांचे मागणीप्रमाणे आरोपी क्र.२ देविदास पाटील यांनी तक्रारदार यांचेकडुन लाचेची दीड लाख रू.रक्कम उपनिबंधक (परसेवा),सहकारी संस्था,जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लि. जळगाव, तिसरा मजला,बी.जे.मार्केट जळगाव येथे स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
ही कारवाई मा.भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र,नाशिक.मा.माधव रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.मा.सुनील दोरगे,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र,नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी श्री. योगेश ठाकूर,पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव सापळा अधिकारी रेश्मा अवतारे,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव सापळा पथक पो.नि.हेमंत नागरे, पोहेकॉ / बाळु मराठे,मपोहेकॉ / संगिता पवार, पो.कॉ / मनोज पाटील व पो. कॉ. सचिन चाटे सर्व नेमणुक ला.प्र.वि.जळगांव तपासी अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. जळगांव यांनी केली.