Wednesday, May 20, 2026
Homeजळगावभुसावळ परिसरात अवैध वाळू वाहतुकीचा सुळसुळाट; महसूल व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह 

भुसावळ परिसरात अवैध वाळू वाहतुकीचा सुळसुळाट; महसूल व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह 

गौण खनिज माफियांना राजकीय अभय? भुसावळ विभागात संतापाचे वातावरण

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळसह मुक्ताईनगर, बोदवड आणि आसपासच्या परिसरात अवैध वाळू, पिवळी माती तसेच इतर गौण खनिजांचे उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. विशेष म्हणजे ही वाहतूक दिवस-रात्र बिनधास्तपणे सुरू असतानाही महसूल व पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने संबंधित विभागांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड परिसरात अवैध उत्खनन वाढले; चौकशीची मागणी !

शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी अवैध उत्खनन व वाहतूक केली जात आहे. संबंधित वाहनांद्वारे रेती व गौण खनिजांची वाहतूक सर्रास सुरू असून, यामागे काही प्रभावशाली व्यक्तींचे पाठबळ असल्याची चर्चा परिसरात आहे.

छोट्यांवर कारवाई, मोठे मात्र मोकाट? अवैध वाळू व्यवसायावर नागरिकांचा सवाल

प्रशासनाकडून केवळ किरकोळ व्यावसायिकांवर कारवाई केली जाते; मात्र मोठे ठेकेदार, आर्थिकदृष्ट्या सक्षम घटक आणि काही राजकीय हस्तक्षेप असलेले घटक यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.अवैध रेती वाहतुकीमुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असून नदीपात्रांचे नुकसान, भूजल पातळीत घट आणि नैसर्गिक संसाधनांची हानी होत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

रात्रंदिवस सुरू अवैध रेती वाहतूक; प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून अवैध उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भुसावळ विभागातील नागरिकांकडून होत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या