भुसावळ शहरात अवैध वाळू साठ्यांचा सुळसुळाट; दलालांचे रॅकेट सक्रिय, कारवाईची मागणी
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – शहर व परिसरात अवैध वाळू साठ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याची गंभीर बाब समोर येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये नियमबाह्य पद्धतीने वाळूचा साठा करून त्याची खुलेआम विक्री केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या संपूर्ण प्रकारामागे दलालांचे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
माहितीनुसार, रात्रीच्या वेळी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून ती शहरातील मोकळ्या जागांवर, गोदामांमध्ये तसेच काही खासगी प्लॉटवर साठवली जात आहे. त्यानंतर ही वाळू बांधकाम व्यावसायिकांना जादा दराने विकली जात असल्याचे सांगितले जाते. महसूल विभाग व संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार वाढत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.



