भोरगाव लेवा पाटीदार न्यायपंच मंडळाने वाहिली श्रद्धांजली
फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भोरगाव लेवा पाटीदार न्यायपंच मंडळाने अखिल भारतीय लेवा पाटीदार समाजाचे कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील यांचे दि. ८ ऑगस्ट २४ रोजी निधन झाले. तसेच नुकतेच नेपाळ मधील बस दुर्घटनेत प्राण गमावलेले आबालवृद्ध यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिनांक २५ ऑगस्ट २४ रोजी भोरगाव लेवा न्यायपंच ठाया पाडळसे यांची न्यायनिवाडा बैठक लोक विद्यालय पाडळसे येथे घेण्यात आली. या बैठकीच्या प्रारंभी मयत जीवात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कुटुंबनायक ललीतकुमार रमेश पाटील पाडळसे, डॉ. सौ. प्रियदर्शनी अतुल सरोदे सावदा, सौ. सरला पांडूरंग वारके मस्कावद, सौ. अनिता अरुण बऱ्हाटे पाडळसे, सौ. गीता शिरीष चौधरी खिरोदा, सौ. पूजा रूपेश सरोदे जळगांव सौ. ज्योत्स्ना यादवराव बऱ्हाटे जळगाव, सौ. प्रगती सुनिल पाटील भुसावळ, गुणवंत गोपाळराव चौधरी भुसावळ, दिनेश सिताराम भंगाळे भुसावळ, नामदेव नारायण चौधरी भुसावळ,
यादवराव पुना बऱ्हाटे जळगाव, सेक्रेटरी जगदीश फिरके, सेवक नितीन बऱ्हाटे, डिगंबर बऱ्हाटे यांचेसह समाज बांधव व नागरिक उपस्थित होते.