Tuesday, May 26, 2026
Homeजळगावजळगावात खळबळ - कॉल न घेतल्याने शोधायला गेलेले वडील, दिसला मुलाचा प्रेत;...

जळगावात खळबळ – कॉल न घेतल्याने शोधायला गेलेले वडील, दिसला मुलाचा प्रेत; गेल्या आठवड्यात मारहाण, धमकी अन् आता मृत्यू !

जळगावात खळबळ – कॉल न घेतल्याने शोधायला गेलेले वडील, दिसला मुलाचा प्रेत; गेल्या आठवड्यात मारहाण, धमकी अन् आता मृत्यू !

 

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शिरसोली नाका परिसरात ३६ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी (२५ मे) दुपारी उघडकीस आली. मयताच्या वडिलांनी मुलाला मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप करत खूनाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

मयत शशिकांत रमेश कोळी (वय ३६, मूळ रा. तादलवाडी, ता. रावेर) हे व्यवसायाने चालक होते. सकाळपासून मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते कॉल उचलत नसल्याने त्यांचे वडील रमेश कोळी त्यांना शोधत होते. शिरसोली नाका परिसरात त्यांना मुलाचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला, गेल्या आठवड्यात शशिकांत यांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली होती. त्यावेळी त्यांना “मारून टाकण्याची” धमकीही देण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच शशिकांत यांचा मृत्यू झाल्याने त्यांनी हा प्रकार खून असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

 

“माझ्या मुलाला धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर तो मरण पावला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी,” अशी मागणी रमेश कोळी यांनी केली आहे.सद्यस्थितीत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, मृत्यूचे नेमके कारण आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या