Sunday, September 6, 2026
Homeगुन्हापोलीस व महामार्ग पोलीसांच्या कारवाई त कन्व्हर्टर चोरी करणारे दोघे अटकेत

पोलीस व महामार्ग पोलीसांच्या कारवाई त कन्व्हर्टर चोरी करणारे दोघे अटकेत

पोलीस व महामार्ग पोलीसांच्या कारवाई त कन्व्हर्टर चोरी करणारे दोघे अटकेत
जळगाव  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
महामार्ग पोलीस पाळधी व पोलीस स्टेशन पारोळा यांची संयुक्त कारवाई त ; ईको वाहनांच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, केला असून संशयित दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे .

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ०५ सप्टेंबर २०२६ : महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी येथील मोबाईल पथक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर नियमित पेट्रोलिंग करीत असताना म्हसवे, ता. पारोळा गावाच्या पुढे दुपारी सुमारे १२.३० वाजता संशयित वॅगनार वाहन क्रमांक DL3CBU3358 आढळून आले.

पथकाने या वाहनाची चौकशी केली असता त्यामध्ये तीन इसम आढळून आले. पोलिसांना पाहून त्यापैकी एक इसम घटनास्थळावरून पळून गेला. उर्वरित दोन इसमांकडे वाहनाची कागदपत्रे व इतर आवश्यक माहितीबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये टॉमी, हातोडा तसेच गुन्हा करण्यासाठी वापरता येणारे इतर संशयास्पद साहित्य आढळून आले. तसेच मारुती ईको वाहनाचे तीन सायलेंसर/कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मिळून आले.

या कारवाईत ईको वाहनांच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, आसीफ यामीन, वय २२ वर्षे, रा. गाझियाबाद आणि आरीफ सलीम, वय २३ वर्षे, रा. अलीगढ यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून तीन सायलेंसर/कॅटॅलिटिक कन्व्हर्टर तसेच अंदाजे ५ ते ६ किलो सायलेंसर माती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ५०,००० रुपये आहे.

ताब्यात घेण्यात आलेले संशयित वाहन व दोन्ही आरोपी पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन, पारोळा यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. घटनास्थळावरून पळून गेलेल्या संशयिताचा शोध सुरू आहे.

ही कारवाई महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी व पोलीस स्टेशन, पारोळा यांच्या संयुक्त पथकाने केली. या पथकात महामार्ग पोलीस केंद्र चे पोलीस हवालदार हितेश पाटील, राजेंद्र ठाकुर, अनिल सपकाळे, विजय दुसान, सुशिल पाटील आणि चालक पोलीस नाईक संदिप पाटील यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या