ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न.
ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा;
शिक्षकांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ.
भुसावळ: खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवार रोजी दि ५ सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली.
याप्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले विविध कलागुण सादर केले. शिक्षकांनी सादर केलेल्या विविध नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
या विशेष प्रसंगी सर्व शिक्षकांना व नॉन टिचींग कर्मचाऱ्यांना शाळेच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रिंसिपल निना कटलर यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शाळेच्या प्रिंसिपल निना कटलर,व्हॉइस प्रिन्सिपल श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर, कार्यालयीन अधीक्षक सविता सहजे,शिक्षिका सोनाली मुजुमदार,हर्षला पाटील,स्मिता जाधव,एनेट मॅथ्यू यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया रायन व श्वेता जोशी यांनी तर आभार प्रिंसिपल निना कटलर यांनी मानले.
फोटो कॅप्शन – ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी शिक्षक दिनानिमित्त व्दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना प्रिन्सिपल निना कटलर सोबत श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर,सविता सहजे व इतर शिक्षिका.

