राजमुद्रा ग्रृपने तयार केले दहा हजार सीड बाॅल

फैजपुर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
शहरामध्ये गेल्या १० वर्षापासून निसर्ग सेवेत कार्यरत असलेला राजमुद्रा ग्रृप ने या वर्षी विविध देशी वृक्षांच्या १०००० बिया जमा करून त्या बियांपासुन सीड बाॅल तयार करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. यात चिंच, बहावा, सीताफळ, रामफळ, आंबा, जांभुळ, आपटा,पारिजातक, कांचनार,करंज,खिरनी,बेल अशा स्थानिक झाडाच्या बियांचा समावेश आहे. सीड बाॅल तयार करून सातपुड्यात टाकून सातपुडा संवर्धन करण्याचा एक प्रयत्न राजमुद्रा ग्रृप तर्फे केला जात आहे. १०००० च्या वर सीड बाॅल तयार करून झालेले आहेत. या उपक्रमात सुजित गलवाडे, शुभम सितापुरे, मेहुल जैन, दीप गुजराथी, प्रशांत भावसार, प्रथम जैन, राकेश
विसावे, प्रथम वर्मा, प्रयास वर्मा, विक्की जायसवाल, राहुल परदेशी,नितीन काटे,धीरज सोनवणे ,विशाल वर्मा, कन्हैया इंगळे, कैलास जैन, प्रतिक जायसवाल, वीरेंद्र जैन, ॠगवेद टोके व आदित्य, तनय, सोहम, विश्वेश, अवधुत, दक्ष या सर्वांचे सहकार्य लाभत आहे. या उपक्रमासाठी श्री खंडोराव देवस्थान ने जागा उपलब्ध करून दिलेली आहे. सीड बाॅल हे माती, शेणखत व राख यांच्या मिश्रणातून तयार केले जात आहे. सदर उपक्रमास अनेक नागरिकांना विविध बिया उपलब्ध करून दिल्या. पावसाळ्यात या सीड बाॅल मधून सुंदर अशी रोपे तयार होईल व त्यांचे रूपांतर पुढे मोठ्या वृक्षात होईल .सर्वांनी आपपल्या परीने असे सीड बाॅल तयार करून निसर्गा पर्यंत पोहोचवावे असे आवाहन राजमुद्रा ग्रृप चे अध्यक्ष किरण मोरे यांच्या तर्फे केले जात आहे.

