Tuesday, March 10, 2026
Homeजळगावसमृद्धी महामार्गाच्या उपरस्त्यात पावसाचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे हाल

समृद्धी महामार्गाच्या उपरस्त्यात पावसाचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे हाल

समृद्धी महामार्गाच्या उपरस्त्यात पावसाचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे हाल

वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी –  नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असतांना साकरी, फेकरी या गावातील शेतकरी, नागरिक वाहनधारकांसाठी सर्विस रोड तयार केला होता, व पावसाचे पाणी जाण्यासाठी पाईप टाकण्यात आला होता. पण तो ही बुजला आहे. साकरी रोड हा कॉंक्रिटीकरण होत असून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न केल्याने ते पाणी उपरस्त्यात साचत आहे. सदर ठिकाणी तीन फूट पाणी साचल्याने नागरिक, शेतकरी व वाहनचालक पाण्यामधून जीव मूठीत घेऊन आपले वाहन काढत आहे. सदर ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याविषयी येथील नागरिकांनी हावे प्राधिकरण यांना ऑनलाईन सात ऑगस्टला आर टी आय द्वारा कम्प्लेन्ट करून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केल्याने माजी उपसभापती गजानन नेमाडे व परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सदर रस्त्याचा वापर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी करावा लागत असून त्यांना या साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांचे असे म्हणने आहे की, आम्ही या मार्गातून ये-जा करत असून शेतातून माल आणणे अशक्य होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पाण्याचा योग्य निचरा काढून मार्ग मोकळा करावा, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या