Thursday, June 25, 2026
Homeजळगावभोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या यशाचा ट्रॉफी देऊन सन्मान; शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी उपक्रम

जळगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             भोकर, ता. जळगाव तालुक्यातील भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा इंजि. मोनालिका किशोर पवार यांच्या पुढाकाराने इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या जयश्री अनिल पाटील, ज्येष्ठ नेते प्रभाकर गोबाजी पवार, विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे, सोनाली देऊळकर, रावेर जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ठाकरे, सरपंच प्रमिला सोनवणे, सुधाकर फाकिरा पवार, माजी सरपंच हरीश पवार, प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

कार्यक्रमाला भोकर गावातील श्रीराम पाटील, किशोर पवार, सुरेश पवार, सुभाष पवार, शिवानंद पवार, प्रभाकर सोनवणे, अशोक पाटील, सुकदेव बाविस्कर, लोटण सोनवणे, विलास सोनवणे, धनराज वारडे, नाना कुंभार यांच्यासह गावातील महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणा

या उपक्रमामुळे भोकरसह पंचक्रोशीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक वातावरण अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यशाचा गौरव कायम राहणार

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन सोनवणे आणि रवींद्र गायकवाड यांनी केले.

कोट

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे जाण्यास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा विद्यार्थी आणि पालकांना निश्चितच सकारात्मक लाभ होईल.”

इंजि. मोनालिका किशोर पवार, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, जळगाव

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या