संगीत केवळ कला नसून मनःशांतीचा, तणावमुक्त जीवनाचा प्रभावी मार्ग – मा. खा.डॉ.उल्हास पाटील

भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे विभाग भुसावळतर्फे ‘स्वररत्न’ स्पर्धा
भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
संगीत ही केवळ कला नसून मनःशांतीचा आणि तणावमुक्त जीवनाचा प्रभावी मार्ग आहे. अशा स्पर्धांमधून समाजातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळते आणि नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले.
भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे ‘स्वररत्न’ संगीत स्पर्धेचे शहरातील प्रभाकर हॉलमध्ये रविवार, 21 रोजी आयोजन करण्यात आले. स्पर्धकांनी सादर केलेल्या दर्जेदार गायनामुळे कार्यक्रमात रंगत आली. या स्पर्धेसाठी समाजातील राज्यातील 65 स्पर्धकांनी भाग घेतला. यातील 25 ते 30 स्पर्धकांचे आँडीशनद्वारे निवड करून त्यातून विजेते निवडण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अश्विनी भंगाळे यांच्या सुमधुर गणेशस्तवनाने झाली. युगल गीत स्पर्धेत उल्हासनगरातील राजेश भंगाळे व देवश्री भंगाळे ही जोडी प्रथम आली. या स्पर्धेतील सोलो गायन स्पर्धेत उल्हासनगरच्या देवश्री राजेश भंगाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कळमोदा येथील चेतन मयूर जावळे यांनी द्वितीय, तर वरणगावच्या मानस गोपाळ पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. युगल गीत स्पर्धेत उल्हासनगरचे राजेश भालचंद्र भंगाळे व देवश्री राजेश भंगाळे या जोडीने प्रथम क्रमांक मिळविला. ऐश्वर्या योगेश पाटील व योगेश प्रशांत राणे यांनी द्वितीय, तर डॉ. चेतन ढाके व कुशल ऑफसेटच्या वर्षा कुशल पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्या जोड्यांनाही रोख पारितोषिक, शिल्ड व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.स्पर्धेचे परीक्षण जळगावचे एन.ओ.चौधरी, भुसावळच्या चैताली पाचपांडे आणि फैजपूरचे शिवम चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा लोखंडे व सुभाषचंद्र भंगाळे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, कुटुंबनायक ललितदादा पाटील तसेच भुसावळ विभाग प्रमुख सुहास चौधरी उपस्थित होते. यावेळी डॉ.विकास कोळंबे, डॉ.वर्षा कोळंबे, प्रमोद धनगर, गोविंदा ढाके, निळू भारंबे, सुधीर पाटील, प्रभा पाटील, जगदीश फिरके, दिनेश पाटील, अरविंद झोपे, मनोज जावळे, जेष्ठ नागरिक संघाचे महादेव हरीमकर यांच्यासह अनेक मान्यवर व रसिक उपस्थित होते. पंचायतचे संचालक आरती चौधरी, हरीष फालक, परिक्षित बर्हाटे, शरद फेगडे, किरण चौधरी, मंगला पाटील, वर्षा पाटील, संजय पाटील, अजय पाटील, अनिल वारके, धनंजय पाटील उपस्थित होते.

