Wednesday, September 16, 2026
Homeआंदोलनशिवसेनेचे स्मार्ट मीटर, ट्रान्सफॉर्मर प्रश्नांवर आंदोलन

शिवसेनेचे स्मार्ट मीटर, ट्रान्सफॉर्मर प्रश्नांवर आंदोलन

शिवसेनेचे स्मार्ट मीटर, ट्रान्सफॉर्मर प्रश्नांवर आंदोलन

 

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               वरणगाव /वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, शेतातील जळालेले ट्रान्सफॉर्मर, वाढीव वीजबिले आणि सक्तीने बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी वरणगाव येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीजपुरवठा व्यवस्थित करणे, खराब ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलणे आणि स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्याची मागणी करण्यात आली.

महावितरण अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत लेखी

 

Oplus_131072

आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात जिल्हा महिला आघाडी प्रमुख नंदा निकम, तालुकाप्रमुख रेखा देशमुख, नगरसेविका तृप्ती महाजन, माला मेढे, कामगार नेते मिलिंद मेढे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, भगवान पाटील, विलास मुळे, संतोष माळी, दुर्गेश बेदरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या