Saturday, July 4, 2026
Homeगुन्हाखाजगी शिक्षण संस्थेच्या चेअरमन विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल.

खाजगी शिक्षण संस्थेच्या चेअरमन विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल.

खाजगी शिक्षण संस्थेच्या चेअरमन विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल.

Oplus_131072

<img class

मुलांचे एलसी दाखला घेऊन जा महिला पालकाला दमदाटी.

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                     दि. ४  अचानक शाळेतील सिल्याबस मधे बदल का केला.? अशी विचारणा महिला असलेल्या मुलाच्या पालकांने केल्याने यावल शहरात शिक्षण क्षेत्रात सोयीनुसार आर्थिक व्यवसाय करण्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या एका चेअरमन विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडून शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरात व परिसरात शिक्षण क्षेत्राचे आणि सामाजिक प्रभावाचे, वर्चस्व व महत्त्व लक्षात घेऊन बाहेरगावच्या एका चेअरमनने मारवाडी पद्धतीने गेल्या वर्षी यावल शहरातील एक शिक्षण संस्था मोठी रक्कम देऊन विकत घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक प्राप्ती होण्यासाठी शिक्षण क्षेत्राच्या सर्व अटी शर्ती नियम धाब्यावर ठेवून विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना वेठीस धरून शाळेतून पोशाख,व या पुस्तके इत्यादी शैक्षणिक साहित्य ठरलेल्या किमतीतच विकत घ्याव्या लागेल असा “फतवा” काढल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये तीव्र समता व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत यावल पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांचे सुद्धा अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा पालकांमध्ये आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून त्या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या पालकांसह संस्थेचे चेअरमन यांच्यात तीन-चार वेळा बैठका होऊन शाब्दिक चकमकी उडाल्या.
या चकमकीची चर्चा सरळ आमदारांपर्यंत पोहोचल्याने शालेय साहित्यासाठी पैशाची मागणी करणारे मेसेज संस्थेमार्फत तात्काळ डिलीट करण्यात आले.

इयत्ता नववी आणि दहावी तुकड्यांना शिक्षण विभागाकडून परवानगी नसताना शिक्षण संस्थेच्या चेअरमनने नववी,दहावी वर्गातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया बेकायदा राबवली कशी.?
गेल्या वर्षी दहावी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा दुसऱ्या शाळेत घेण्यात आली, तेथे सुद्धा शाळेच्या संबंधितांमार्फत कॉपी प्रकरण प्रसिद्धी माध्यमातून चांगलेच झळकले आणि तसा यावल पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा नोंद झाला आहे.या शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कामकाजाची यावल पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी आणि जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी काय चौकशी आणि काय पाहणी करतात.? किंवा नाही.? किंवा काही आर्थिक हितसंबंध जोपासले आहेत का.? याबाबत सुद्धा चर्चा आहे.

अशाच प्रकारे दोन मुलांच्या महिला असलेल्या पालकाने शिक्षण संस्था चेअरमन यांच्याशी संपर्क साधून अचानक सिल्याबस का बदलविला.? अशी विचारणा केली असता शिक्षण संस्थेच्या चेअरमनने सरळ त्या मुलांचे लिव्हिंग सर्टिफिकेट काढून घ्या अशी दमदाटी करीत शाळेतील लिपिकाला त्या मुलाचे लिविंग सर्टिफिकेट काढायला लावून त्या लिपीकाने दुसऱ्या एका शाळेत त्या मुलाचा परस्पर प्रवेश करून दिला.हा प्रवेश सुद्धा त्या मुलाच्या पाल्यांना मान्य नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
त्याचप्रमाणे त्या मुलांच्या पालकाला भ्रमणध्वनी वरून लिविंग सर्टिफिकेट काढून घेण्यासाठी दमदाटी केल्याने त्या महिलेने चेअरमन विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंद केला परंतु चेअरमनच्या आर्थिक प्रभावामुळे कारवाई झालेली नाही.
असे असले तरी सदरच्या शिक्षण संस्थेविरोधात यावल शहरातील अनेक पालकांच्या तक्रारी असताना यावल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग निद्रिस्त अवस्थेत आहे का.? असा प्रश्न आणि चर्चा होत असली तरी लोकप्रतिनिधींनी या बाहेरगावाहून आलेल्या शिक्षण सम्राट होऊ पाहणाऱ्या चेअरमन विरुद्ध योग्य ती कायदेशीर नियमानुसार कार्यवाही करावी अशी सर्व स्तरात चर्चा आहे.

या प्रकरणात शिक्षण संस्थेच्या चेअरमन मार्फत असलेला एक प्रतिनिधी मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार न करता शिक्षण संस्था चालकाच्या मनमानी कारभाराला प्रोत्साहन देत पालक,शिक्षण संस्था चालकांच्या बैठकीला हजर राहत असल्याने त्या प्रतिनिधीमार्फत सुद्धा यावल शहरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या