Thursday, July 9, 2026
Homeजळगावडॉ. प्रविण पाचपांडे यांची भाजपा मुक्ताईनगर दक्षिण मंडळ वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्षपदी निवड

डॉ. प्रविण पाचपांडे यांची भाजपा मुक्ताईनगर दक्षिण मंडळ वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्षपदी निवड

डॉ. प्रविण पाचपांडे यांची भाजपा मुक्ताईनगर दक्षिण मंडळ वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्षपदी निवड
मुक्ताईनगर |  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंती स्मरण पंधरवाड्यानिमित्त भारतीय जनता पार्टी, मुक्ताईनगर विधानसभा यांच्या वतीने आयोजित संघटनात्मक बैठकीत पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये डॉ. प्रविण अंकात पाचपांडे यांची भाजपा मुक्ताईनगर दक्षिण मंडळ वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि सामाजिक कार्याच्या बळावर डॉ. पाचपांडे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या संघटनात्मक बैठकीस केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा खासदार रक्षाताई निखिल खडसे, ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्रजी फडके, अशोकजी कांडेलकर यांच्यासह मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील सावदा, मुक्ताईनगर व बोदवड या तिन्ही तालुक्यांतील उत्तर व दक्षिण मंडळांचे अध्यक्ष, विविध आघाड्या व सेलचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून संघटन विस्तार, जनसंपर्क आणि जनसेवा अधिक प्रभावी करण्याचे आवाहन उपस्थित नेत्यांनी केले.
डॉ. प्रविण पाचपांडे यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील राजकीय, सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Oplus_131072

<img class

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या