गटार बांधकामाचे खरे श्रेय प्रभागातील जागरूक नागरिकांचे
नगरसेविका सौ.कल्पना वाणी.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२१
वाणी गल्लीतील गटार कामाचे खरे श्रेय प्रभागातील जागरूक नागरिकांचे आहे.अशी माहिती नगरसेविका सौ.कल्पना वाणी दिली.
नगरपरिषद हद्दीत कोणत्याही विकासकामामागे जनतेचा पाठपुरावा असेल तरच त्याला यश येते.वाणी गल्लीतील नागरिकांना गटारीच्या समस्येमुळे होत असलेल्या त्रासाविरुद्ध आणि आपल्या हक्कासाठी वेळोवेळी आवाज उठवला.या समस्येचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी नागरिकांनी आमदार अमोलदादा जावळे, नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील, प्रभागातील नगरसेवक,न.प.
मुख्याधिकारी,न.प.बांधकाम अभियंता आणि समाजसेवक या सर्वांकडे जाऊन आपली कैफियत मांडली आणि सतत पाठपुरावा केला.नागरिकांच्या या एकजुटीमुळे आणि जागृतीमुळेच आज गटारीचे हे काम मार्गी लागले आणि ते काम लवकरच पूर्ण होईल.
नागरीकांनी आम्हाला वार्डाचा सेवक म्हणुन निवडुन दिले आहे श्रेय घेण्यासाठी नाही.श्रेय आमचे नाही.श्रेय नागरीकांचे असे बोलताना यावल नगर परिषद भाजपा नगरसेविका सौ.कल्पना दिलीप वाणी यांनी सांगितले.

