Thursday, July 9, 2026
Homeजळगावनगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भाजप-शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन.  प्रत्येक प्रभागाला समान...

नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भाजप-शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन.  प्रत्येक प्रभागाला समान निधी द्यावा या मागणीवरून सभेत घोषणाबाजी .

नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भाजप-शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन.  प्रत्येक प्रभागाला समान निधी द्यावा या मागणीवरून सभेत घोषणाबाजी .

Oplus_131072

<img class

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              वरणगाव, ता. भुसावळ
वरणगाव नगर परिषदेची सर्व साधारण सभा गुरुवार दि .९ जुलै रोजी येथिल न .प. सभागृहात ११ते ०३ या वेळेत पार पडली .सभेमधे प्रत्येक वॉर्डाला विकासकामांसाठी समान निधी उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदविला. काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी समान निधी वाटपाबाबत सकारात्मक भूमिका घेत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गुरुवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेला प्रारंभ झाला. सभेच्या सुरुवातीलाच विविध वॉर्डांतील विकासकामांसाठी निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विरोधी सदस्यांनी सर्व वॉर्डांना समान न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका मांडत निधी वाटपात कोणताही भेदभाव होऊ नये, अशी ठाम मागणी केली. त्यानंतर भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहातच खाली बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका करत निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनादरम्यान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी आंदोलक सदस्यांशी चर्चा केली. प्रत्येक वॉर्डाच्या विकासाचा विचार करून निधी वाटपाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन सादर करून आंदोलन मागे घेतले.
यावेळी विशेष बाब म्हणजे वरणगाव येथील क्रीडांगणा विषयीच्या विषयावर उपनगराध्यक्ष अरुणाबाई इंगळे यांना भाजपच्या म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी अनभिज्ञ ठेवल्यामुळे त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली होती त्यांनी याबाबत आपल्या सदस्यांचा चांगलाच समाचार घेतला व स्वतः एवढ्या वर्षांपासून राजकारणात असून असा भेदभाव मी कधीच केला नाही असे सर्वांना ठणकावून सांगितले त्याचप्रमाणे सुनील काळे यांनी शासनातर्फे मंजूर करून आणलेला फुलगाव फाटा ते श्री साईबाबा मंदिर पर्यंतचा रस्ता हा दुभाजक टाकून मंजूर करण्यात आला होता परंतु ऐनवेळी या वर्षी सदरचा रस्ता ना मंजूर केल्याचे पत्र मिळाल्यामुळे सदरचा रस्ता कोणी ना मंजूर केला त्यात झारीतील शुक्राचार्य कोण याचा तपास घेऊन पुन्हा या रस्त्यासाठी आणि

 

वरणगावकरांसाठी मोठे आंदोलन उभारणार असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले यावेळी भाजप व शिवसेनेच्या सदस्यांनी वेगवेगळी निवेदने देऊन नगरपरिषद प्रशासनाचा रोष व्यक्त केला दरम्यान राजेंद्र चौधरी यांनी नगर परिषदेतील चोरी झाल्यासंबंधीचा प्रश्न मुख्याधिकारी यांना विचारला असता त्यांनी सदर प्रश्नाला बगल देऊन उत्तर देण्याचे टाळले तसेच सध्या चार दिवसाआड मिळणारे पाणी एक दिवसाआड केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे सुनील काळे यांनी सांगितले .
सभेत एकूण पुढिल ११ विषयांवर सविस्तर चर्चा झाली . त्यात प्रामुख्याने- भोगावती नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील सांडपाणी नदीत जाणे थांबविण्याच्या उद्देशाने नदीच्या दोन्ही बाजूंनी ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. तसेच नदीचे पुनर्जीवन, सुशोभीकरण आणि खडखडीजवळ बंधारा उभारण्याच्या विषयांचाही समावेश आहे. शहरातील उर्वरित भागात सपोर्ट पाइपलाइन टाकणे, महात्मा गांधी हायस्कूलजवळील नाल्याचे सुशोभीकरण तसेच अक्सानगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बीओटी (BOT) तत्त्वावर किंवा शासकीय निधीतून शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याबाबतही विचारविनिमय होणार आहे.याशिवाय नगरपरिषद व शासनाच्या विविध योजनांतील सार्वजनिक इमारतींना नगरपरिषदेचे नाव देणे, एन.ए., बांधकाम व व्यवसाय नाहरकत परवानग्यांचे अर्ज सभेपुढे ठेवणे आणि नगरपरिषदेमार्फत आठवडे बाजार सुरू करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली.

शहरातील विविध प्रलंबित विषयांवर सदस्यांनी आपापली मते मांडली. कर्मचारी यांनी नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने काम करावे, शहरातील अतिक्रमणे तातडीने हटवावीत तसेच चुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनेक सदस्यांनी केली. मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

सभेदरम्यान सिद्धेश्वर नगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात गढूळ पाठ्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात आला. यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्या चा सत्कार करण्यात आला.पाणीपुरवठ्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

तसेच मुख्याधिकाऱ्यांनी महत्त्वाची सूचना देताना नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजात कोणत्याही नगरसेवक किंवा नगरसेविकांच्या नातेवाईकांनी हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट केले. अशा प्रकारचा हस्तक्षेप आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सर्वसाधारण सभेला नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्षा अरुणाताई इंगळे, मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. समान निधी वाटपाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनामुळे ही सभा विशेष चर्चेचा विषय ठरली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या