Tuesday, April 21, 2026
Homeजळगावबसमत तलाठी हत्या प्रकरणी भुसावळ येथे तलाठ्यांचे काम बंद आंदोलन

बसमत तलाठी हत्या प्रकरणी भुसावळ येथे तलाठ्यांचे काम बंद आंदोलन

बसमत तलाठी हत्या प्रकरणी भुसावळ येथे तलाठ्यांचे काम बंद आंदोलन

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील संतोष पवार नामक तलाठी यांच्या हत्याप्रकरणी भुसावळ तलाठी संघाने आज काम बंद आंदोलन पुकारले होते याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे

 

याप्रसंगी निवेदनात म्हटले आहे की दिवसेदिवस तलाठी व सर्कल यांच्यावरती गुंडाचा दबाव वाढत असून वाळू तस्करी व इतर गुंड तलाठ्यांवर मारहाण व शिवीगाळ या घटनांमध्ये वाढ होत . यावर सरकारने ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी संतोष पवार यांना केवळ संशयाच्या आधारे दुसऱ्याच्या नावावर जमीन करून देईल या संशयाने घरात घुसून भरदिवसा हत्या केली आहे . या साठी एक दिवसाचे तलाठी संघाने कामबंद ठेवले आहे .
तलाठी संघाचे अध्यक्ष पवन नवगाळे , विशाखा मुन , मिलींद तायडे ,साधना खुळे मॅडम ‘ आर डी पाटील ,हिना शेख व तलाठी व मंडल अधिकारी उपस्थित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या