वसमत तलाठी हत्या प्रकरणी भुसावळ येथे तलाठ्यांचे काम बंद आंदोलन!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जिल्ह्यातील वसमत येथील संतोष पवार नामक तलाठी यांच्या हत्याप्रकरणी भुसावळ तलाठी संघाने आज काम बंद आंदोलन पुकारले होते याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी निवेदनात म्हटले आहे की दिवसेदिवस तलाठी व सर्कल यांच्यावरती गुंडाचा दबाव वाढत असून वाळू तस्करी व इतर गुंड तलाठ्यांवर मारहाण व शिवीगाळ या घटनांमध्ये वाढ होत . यावर सरकारने ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी संतोष पवार यांना केवळ संशयाच्या आधारे दुसऱ्याच्या नावावर जमीन करून देईल या संशयाने घरात घुसून भरदिवसा हत्या केली आहे. या साठी एक दिवसाचे तलाठी संघाने कामबंद ठेवले आहे .भुसावळ तलाठी संघटना तालुका अध्यक्ष पवन नवगाळे, उपाध्यक्ष श्रीमती विशाखा मून, तालुका सचिव मिलिंद तायडे एफ एस खान,प्रवीण पाटील, मोनिका बडगुजर, नितीन केले, बाळासाहेब गायकवाड, रोशन कापसे, सुनीता वळवी, दामिनी महाजन, निता जायले,सोनाली कोळी रेणुका पाटील व तलाठी व मंडल अधिकारी उपस्थित होते .