Saturday, July 18, 2026
Homeजळगावसरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाबाबत पालक - शिक्षक समन्वयातून गुणवत्ता वृद्धीला...

सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाबाबत पालक – शिक्षक समन्वयातून गुणवत्ता वृद्धीला चालना मिळणार.

सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाबाबत पालक – शिक्षक समन्वयातून गुणवत्ता वृद्धीला चालना मिळणार..

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    दि.१८
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय,पालक-शिक्षक समन्वयातून गुणवत्ता वृद्धीला चालना मिळणार आहे येथील सरस्वती विद्या मंदिर,कनिष्ठ महाविद्यालयात पालक – शिक्षक संघाची सहविचार सभेत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पालक-शिक्षक संघाची सहविचार सभा शनिवारी सकारात्मक वातावरणात पार पडली.या सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यात विद्यार्थ्यांच्या गुणवंत्तेवर चर्चा करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.सी.ठाकूर हे होते.व्यासपीठावर पालक प्रतिनिधी शशिकांत वारुळकर व सुवर्णा बारी,ज्येष्ठ शिक्षक एन. डी.भारुडे,एस.बी.चंदनकार तसेच कार्यालयीन अधीक्षक दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली.प्रास्ताविकात एस. बी.चंदनकार यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद हा विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया असल्याचे सांगत पालक-शिक्षक संघाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर सर्व शिक्षकांनी उपस्थित पालकांशी परिचय करून देत आपल्या अध्यापन विषयांची व जबाबदाऱ्यांची माहिती दिली.
यावेळी मागील वर्षाच्या पालक-शिक्षक संघ सभेचा अहवाल वाचून तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.पुढे वर्गनिहाय पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगती,
अभ्यासातील अडचणी,शालेय उपक्रम,संस्कार,शिस्त आणि गुणवत्तावाढीच्या दृष्टीने विविध सूचना व मते मांडली. पालकांच्या सूचना अत्यंत सकारात्मक व विधायक असल्याचे यावेळी दिसून आले.
पालक प्रतिनिधी शशिकांत वारुळकर यांनी आपल्या मनोगतात शाळेत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा व मूल्यसंस्काराच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले.शिक्षक प्रतिनिधी भारुडे.ए. एस. सूर्यवंशी आणि नीलिमा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या अभिनव अध्यापन पद्धती,अध्ययन – अध्यापनातील बदल,नियमित मूल्यमापन, स्पर्धा परीक्षा तयारी, संस्कारमूल्ये आणि सर्वांगीण विकासाच्या विविध उपक्रमां विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यालयीन अधीक्षक दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय लाभ योजना, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर, स्वयंशिस्त, शालेय नियमांचे पालन आणि पालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली.अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक ठाकूर यांनी पालकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे समाधानकारक निराकरण केले. विद्यार्थी हाच आमच्या शैक्षणिक कार्याचा केंद्रबिंदू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा बौद्धिक,सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक विकास घडविण्यासाठी शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया अधिक भक्कम करण्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यातील सातत्यपूर्ण समन्वय ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका गाजरे यांनी केले,तर दीपक जोशी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या सहविचार सभेला पालकांचा मोठ्या संख्येने सहभाग हाेता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या