Saturday, July 18, 2026
Homeजळगावपोदार इंटरनॅशनल स्कूल, अक्लुद येथे विद्यार्थी परिषद समितीची स्थापना.

पोदार इंटरनॅशनल स्कूल, अक्लुद येथे विद्यार्थी परिषद समितीची स्थापना.

पोदार इंटरनॅशनल स्कूल, अक्लुद येथे विद्यार्थी परिषद समितीची स्थापना.

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    दि.१८
तालुक्यातील अकलूद येथील
पोदार इंटरनॅशनल स्कूल मधे दि.१८जुलै रोजी विद्यार्थी परिषद समितीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. या समितीतील विद्यार्थ्यांची निवड पारदर्शक मतदान पद्धतीने करण्यात आली होती.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:०० वाजता दीपप्रज्वलनाने झाली.शाळेचे प्राचार्य सचिन बनसोडे,पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ.मनिषा शृंगी, आणि शालेय व्यवस्थापक रामदास कुळकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला.त्यानंतर सरस्वती देवीचे वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी परिषद समितीतील सदस्यांच्या पालकांची उपस्थिती उपस्थित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.

विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी शिस्तबद्ध मार्चपास्ट सादर करत संयम आणि एकता यांचे दर्शन घडवले.त्यानंतर प्राचार्य सचिन बनसोडे यांच्या हस्ते शाळेचा ध्वज फडकावण्यात आला. विद्यार्थ्यांनच्या पालकांनी कर्तव्य आणि नेतृत्वाची जाणीव करून देणारे बॅजेस व शाशे त्यांचे पाल्याला स्वतः प्रदान करून गौरांवित केले,हा पालकांसाठी व उपस्थितांसाठी एक भावनिक आणि अभिमानास्पद क्षण होता.

यानंतर नवनिर्वाचित सदस्य शाळेचा हेड बॉय राजवर्धन पाटील,हेड गर्ल भक्ती फेगडे निरंजन पाटील,इरा अग्रवाल, अनिरुद्ध पाटील,आदित्य पवार, पूजा अग्रवाल,शताक्षी चौधरी, जीत पाटील,जाधव,पलक भंगाळे,श्रावणी जाधव,तोषल देशमुख,प्रणित सोनवणे,भार्गवी धगे,सान्वी सोनवणे,मृदुल बेंडाळे,तेजस्वी सोनजे,अथर्व राय,कनिका तेहलानी,पार्थ शिरसाठ,आयात तडवी,शिवांश परदेशी, इशिता कोटेचा,अर्णव काब्रा,रेणू चौधरी,सक्षम कासार,जान्हवी लद्धा,आरव चोरडिया,विधी ढाके,रिषिक पांगले,सायंती पाटील यांनी
आपल्या जबाबदाऱ्या आणि मूल्यांची जाणीव ठेवून नेतृत्वाची शपथ घेतली.

प्राचार्य सचिन बनसोडे सरांनी प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेकडे वाटचाल करत समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याचा संदेश दिला आणि विद्यार्थी नेत्यांना यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक तयारी केली होती.
असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सचिन बनसोडे यांनी नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या