Saturday, July 18, 2026
Homeजळगावकबड्डी पंच परीक्षेत वरणगावच्या माय लेकीचे यश .

कबड्डी पंच परीक्षेत वरणगावच्या माय लेकीचे यश .

कबड्डी पंच परीक्षेत वरणगावच्या माय लेकीचे यश .
वरणगाव :   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             जळगांव जिल्हा कबड्डी असोशिएशन तर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या पंच परिक्षेत येथिल माय लेकींनी बाजी मारली असुन वरणगावातून प्रथम महिला कबड्डी पंच म्हणून शहराचे नाव जिल्ह्यात चमकवले आहे .
जळगांव जिल्हा कबड्डी असोशिएशन तर्फे नुकतेच जिल्हास्तरीय पंच परीक्षेचे आयोजन जळगाव येथिल ख्वाजामिया रोडवर असलेल्या बबन भाऊ बाहेती महाविद्यालयात करण्यात आले होते .तेथे घेण्यात आलेल्या लेखी ,तोंडी, व प्रात्यक्षिक परीक्षेत रुणाल जितेन्द्र माळी व त्यांची मुलगी वैष्णवी जितेन्द्र माळी यांनी यश संपादन केले असून वरणगावातून प्रथम महिला पंच होण्याचा बहूमान प्राप्त केला आहे . त्यांचे परिसरात कौतुक होत आहे . या पंचपरिक्षेत एकूण ५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यापैकी ४४ जण उत्तीर्ण झाले आहेत .त्यांना जळगांव जिल्हा कबड्डी असो. चे सहकार्यवाह नितीन बरडे , पंच मंडळ अध्यक्ष सुनील राणे व सचिव हरीश शेळके यांचे मार्गदर्शन मिळाले .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या