येथे अँथलेटिक्स खेळाडू, NIS प्रशिक्षक तथा नोकरीस लागलेले खेळाडू यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न .

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील रॉयल अँथलेटिक्स क्लब, 3D अँथलेटिक्स क्लब व जळगाव DSA ॲथलेटिक्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुका अँथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने SAI व मिशन लक्षवेध प्रशिक्षणासाठी निवड झालेले खेळाडू, NIS प्रशिक्षक व पोलीस तसेच अग्निवीरसाठी निवड झालेले खेळाडू यांचा विशेष सत्कार भुसावळ रेल्वे स्पोर्ट्स मैदानावर करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षा सौ.शैलजाताई नारखेडे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयजी सावकारे यांच्या धर्मपत्नी तथा महिला प्रतिष्ठा मंडळाच्या अध्यक्षा सौ.रजनीताई सावकारे, महाराष्ट्र शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक शिवछत्रपती पुरस्कार्थी श्री. किशोर चौधरी, महाराष्ट्र राज्य अँथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनचे सचिव श्री राजेश जाधव, जळगाव जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, उपाध्यक्ष प्रा. इक्बाल मिर्झा, खजिनदार श्री.योगेश सोनवणे, संचालक श्री. निलेश पाटील व मुख्याध्यापक श्री.सचिन महाजन, जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव प्रा. हरीश शेळके, उद्योजक श्री.गोपाल जांगिड, भुसावळ तालुका अँथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत निकम, पदाधिकारी,श्री.रमण भोळे, श्री.राहुल महाजन,श्री.गोपीसिंग राणा यांची उपस्थिती होती जळगाव जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनचे सचिव श्री. राजेश जाधव यांची महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनच्या सचिवपदी तर श्री. योगेश सोनवणे सर यांची महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सौ. रजनीताई सावकारे यांनी तसेच भुसावळ तालुका अँथलेटिक्स असोसिएशनतर्फे

भुसावळ तालुका अँथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत निकम यांनी शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार केला तसेच NIS अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेले प्रशिक्षक ममता शर्मा जांगिड (अँथलेटिक्स), लक्ष्मी चव्हाण (अँथलेटिक्स), श्री. दिलीप संगेले (कुस्ती) व शाहीद पठाण (योगा), 3D फिटनेस क्लबचे सेवेत निवड झालेले खेळाडू निरज धांडे (मुंबई पोलीस) आदर्श चव्हाण (अग्निवीर) तसेच केंद्र शासनाच्या SAI अँथलेटिक्स प्रशिक्षणासाठी निवड झालेले खेळाडू ऋषिकेश बनाईत व सनी कोळी तसेच शासनाच्या मिशन लक्षवेध अँथलेटिक्स प्रशिक्षणासाठी निवड झालेले खेळाडू कृष्णा राठोड, गौरव महाजन, लावण्या तायडे, प्रितेश सोनवणे, शरण्या भंडारी, एश्वर्य वर्मा व प्रसाद सोनवणे यांचा मान्यवरांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला तसेच रॉयल अँथलेटिक्स क्लबचे खेळाडूंना टी शर्ट्सचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भुसावळ तालुका अँथलेटिक्स असोसिएशनचे सचिव श्री. रविंद्र चोपडे व सर्व पदाधिकारी, DSA अँथलेटिक्स क्लबचे प्रशिक्षक श्री. सत्यनारायण पवार, 3D अँथलेटिक्स क्लबचे प्रशिक्षक पोलीस खेळाडू दिग्विजय दाभाडे, रॉयल अँथलेटिक्स क्लबचे प्रशिक्षक ममता शर्मा जांगिड, अश्विनी पॉल, आदित्य पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या आयोजक रॉयल अँथलेटिक्स क्लबच्या मुख्य प्रशिक्षक तथा जळगाव जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनच्या किड्स अँथलेटिक्स प्रशिक्षण प्रमुख NIS प्रशिक्षक ममता शर्मा जांगिड यांनी केले .यावेळी मान्यवरांनी आपण जोपासलेला कोणताही खेळ शारीरिक व्यायामासाठीच उपयोगी आहे असे तो रोजगारासाठी सुद्धा महत्त्वाचा असतो त्याकरता प्रत्येकाने आयुष्यात लहानपणापासूनच विविध खेळांची छंद लावणे व जोपासणे आवश्यक असते असे सांगितले . कार्यकमास खेळाडू, प्रशिक्षक व पालक यांची उपस्थिती होती.

