Monday, July 20, 2026
Homeजळगावकेंद्र सरकारला सदबुद्धी मिळण्यासाठी यावल येथे शिवसेनेने "रामरक्षा महाआरती" केली.

केंद्र सरकारला सदबुद्धी मिळण्यासाठी यावल येथे शिवसेनेने “रामरक्षा महाआरती” केली.

केंद्र सरकारला सदबुद्धी मिळण्यासाठी यावल येथे शिवसेनेने “रामरक्षा महाआरती” केली.

यावल  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी    दि.१८
अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे बांधकाम,पायाभरणी,ट्रस्ट नियुक्तीसह इतर सर्व कार्यक्रमाचे संपूर्ण पूजा विधीचे श्रेय घेतले त्याच प्रमाणे चोरीचे श्रेय सुद्धा भारतीय जनता पार्टीने घ्यायला पाहिजे यासाठी आणि केंद्रातील सरकारला श्री प्रभू श्रीरामचंद्र, श्री हनुमान यांनी सद्बुद्धी देण्यासाठी रावेर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने यावल येथील श्री हनुमान मंदिरात श्रीराम मंदिर लुटी विरोधात राम रक्षा महाआरती केल्याचे जाहीर वक्तव्य शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांनी केले.

रावेर लोकसभा संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी यावल येथे यावल नगरपरिषद शिवसेना उबाठा अध्यक्षां सौ.छाया पाटील.माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील.नगरसेविका वैशाली बारी,नगरसेवक सागर चौधरी, नगरसेवक पराग सराफ, शिवसेना उपजिल्हा संघटक अशोक शिंदे ( रावेर ),योगीराज पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख ( रावेर ), उपजिल्हाप्रमुख गोपाल चौधरी,यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, यावल तालुकाप्रमुख शरद कोळी,माजी नगराध्यक्ष सौ.सुरेखा कोळी,माजी तालुकाप्रमुख कडू पाटील,सारंग बेहेडे,सागर देवांग,बापू जासूद, विजय पंडित,पप्पू जोशी,मयूर खर्चे, गौरव जोशी इत्यादी शिवसेना पदाधिकारी यांच्यासह यावल शहरातील सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून रामरक्षा महाआरती केली.

रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी रामरक्षा आरती केल्यानंतर राम भक्त व हनुमान भक्त यांना विनंतीपूर्वक जाहीर आव्हान करताना सांगितले की प्रभू श्रीरामचंद्र हे एक आदर्श राजा आणि हिंदू धर्माचे आराध्य दैवत हिंदूंचे श्रद्धास्थान असताना आयोध्या मधील श्रीराम मंदिरात भक्तांनी नागरिकांनी दिलेले दान देणगी हे सर्व चोरीचे प्रकार घडले बाबत केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध करीत श्री राम रक्षा महाआरती ब्राह्मण वृंदांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने म्हणून श्री रामचंद्र व श्री हनुमान यांनी केंद्र सरकारला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या