आमोदा उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप : विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
दिनांक 18/7/2026 रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळा आमोदे तालुका यावल येथे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2026/27 चे गणवेश वाटप करण्यात आले यावेळी फैजपूर उर्दू केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख गौस खान सर उपस्थित होते . शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष शेख सादिक भाई व सदस्य शेख साबीर, अशपाक भाई व मुख्याध्यापक मोहम्मद जनाब, अयाज सर, मुबारक सर , तडवी इमरान सर सर्वांच्या उपस्थितीत विद्यार्थी विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थिनी शिफा बी हिने कुरान पठाण करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर शाळेतीलच विद्यार्थिनी शिफा बी अलिझाबे यांनी पठाण पठण केले. यानंतर उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद जनाब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या योजना मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तक ,मोफत बूट, पायमोजे व मध्यान्ह भोजन योजना व इतर योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती, तसेच
विद्यार्थ्यांना स्पेलिंग बी निपून सराव सराव चाचणी, निपुण स्तर वाढ व इतर उपक्रमांची माहिती केंद्रप्रमुख यांनी दिली.
कार्यक्रमाची प्रस्ताविक व सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक अयाज सर व आभार मुबारक सर यांनी मानले.


