Monday, July 20, 2026
Homeजळगावमांडवेदिगर गावाला मिळणार पहिला एमबीबीएस डॉक्टर

मांडवेदिगर गावाला मिळणार पहिला एमबीबीएस डॉक्टर

मांडवेदिगर गावाला मिळणार पहिला एमबीबीएस डॉक्टर

पवन पवारचे नीट परीक्षेत घवघवीत यश

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
मांडवे दिगर गावातील माजी सरपंच अमरसिंग पवार यांचे नातू व ग्रामसेवक ईश्वर पवार यांचे चिरंजीव पवन पवार याने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा नीट मध्ये ५५६ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे पवनची एमबीबीएस शिक्षणासाठी निवड होण्याची दाट शक्यता असून, तो मांडवेदिगर गावाच्या इतिहासातील पहिला एमबीबीएस डॉक्टर ठरणार असल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पवनच्या या यशामागे त्याचे सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि कुटुंबीयांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. विशेष म्हणजे, मा. सरपंच अमरसिंग पवार यांनी अत्यंत प्रतिकूल व हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतही शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत आपल्या कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या दूरदृष्टीचे आणि कष्टाचे फळ आज पवनच्या यशातून सर्वांसमोर आले आहे. पवार कुटुंबातील शिक्षणाची परंपरा यापुढेही कायम असून, रोहन पवार हा सध्या आयटी इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. तसेच चेतन पवार हाही कॅम्पुटर सायन्स इंजिनीरिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून, कुटुंबातील तिन्हीही युवकांनी उच्च शिक्षणाची वाट धरल्याने गावासाठी हा अभिमानाचा विषय ठरला आहे. पवन पवारच्या या यशाबद्दल मांडवेदिगर गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून समाजसेवेचे व्रत स्वीकारावे आणि गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्याला दिल्या जात आहेत.

विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श
पवन पवारच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, कठोर परिश्रम, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या