हरीपुरा धरणात यावल येथील अल्पवयीन मुलाचा मृत्यू.

चुलत भाऊ आणि वहिनी यांच्या समोर घडली दुर्दैवी घटना.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि. १९ यावल तालुक्यातील हरिपुरा
धरणात रविवार दि. १९ रोजी दुपारी यावल येथील महाजन गल्लीतील जयेश संजय फेगडे वय १७ ( होमगार्ड संजय सिताराम फेगडे यांचा मुलगा ) हा आपल्या चुलत भाऊ आणि वहिनी यांच्या सोबत सातपुडा डोंगरातील हरिपुरा धरण परिसरात नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गेले असता हरीपुरा धरण पाणी साठ्यात जयेश फेगडे वय १७ हा पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली.जयेश याला यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन आणले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.जयेश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने संपूर्ण यावल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

