पाल वृंदावन धाम आश्रम परिसरात गुरुपौर्णिमेच्या निमित्त अधिकाऱ्यांचे निरीक्षण
पाल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी पुनमचंद जाधव पाल ता रावेर :- रावेर तालुक्यातील परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धाम येथे मागील आठवड्यात आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या रावेर तालुक्यातील सर्वस्थरीय अधिकारी आढावा बैठकीच्या पारश्वभूमीवर दी. १६ जुलै रोजी आश्रम परिसरात निरीक्षण करण्यात आले.


त्यामध्ये पोलीस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी पार्किंग तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता ब्यारिकेटेड,भाविकांना समाधी दर्शन व सत्संग तसेच भोजन सुरक्षे दरम्यान पोलीस सुरक्षा,महावितरण तर्फे दी २८ ते २९ जुलै दरम्यान आश्रमात सुरळीत विजपूरवठा, ग्रामपंचायत तर्फे स्वच्छता व ठिकठिकाणी कचरा कुंडी, पिण्याच्या पाण्याची सोय, पाथदिवे, आरोग्य केंद्रातर्फे तपासणी शिबीर, एस टी महामंडळाच्या भाविकासाठी जादा बसेस,सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रावेर ते पाल रस्त्याची दुरुस्ती अश्या विविध विषयावर पाल सह आश्रम परिसरात कामाचे निरीक्षण करून त्यावर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्याकडून देण्यात आले. यावेळी पाल वृंदावन धाम आश्रमाचे विद्यमान गादीपती व अखिल भारतीय संत समिती चे प्रदेश अध्यक्ष श्रद्येय संत श्री गोपाल चैतन्य जी

महाराज,तसेच प्रदेश कोषाध्यक्ष संत श्री श्याम चैतन्य जी महाराज यांच्या सह रावेर तहसीलदार, पोलीस निरीक्षक, बी डी ओ,महावितरण उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक पाटबंधारे चे अभियंता, एस टी महामंडळ, आरोग्य अधिकारी सह आदींनी आपआपल्या खातेनुसार कामाचे निरीक्षण केले. गुरु पौर्णिमेच्या दिवशी भाविकांना योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी अधिकाऱ्यांनी ही पाहणी केली आहे .

