Wednesday, July 22, 2026
Homeजळगावभारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार - साता समुद्रा पार रंगला राम भक्तीचा...

भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार – साता समुद्रा पार रंगला राम भक्तीचा सोहळा… सजीव देखाव्याने बालगोपालांसह मोठ्या संख्येने भाविक घेत आहे आनंद

भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार –
साता समुद्रा पार रंगला राम भक्तीचा सोहळा… सजीव देखाव्याने बालगोपालांसह मोठ्या संख्येने भाविक घेत आहे आनंद

फैजपूर :  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या सुमधुर वाणीने महिन्याभरापासून सुरू असलेल्या कॅनडा व अमेरिका येथील सत्संग यात्रेच्या माध्यमातून भाविक भक्त ओतपोत होऊन मनसोक्त आनंद घेत आहे.
१७ जून पासून तर २५ जुलै २०२६ दरम्यान कॅनडातील हेलिफॅक्स, टोरंटो हॅमिल्टन, एडमॉंटन या शहरात तसेच अमेरिकेतील शिकागो, सेंट लुईस, अटलांटा, दक्षिण कॅलिफोर्निया, पेन्सिलवानिया, न्यू जर्सी या शहरांमध्ये जनार्दन हरीजी महाराज यांचे प्रवचन व सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परदेशस्थ भारतीय तथा तेथील बहुसंख्य भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेत आहे.
पेन्सिलवानिया येथील योर्क शहरात श्रीराम कथेचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले. सात दिवसीय या कथेत मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दिली. भाविकांसाठी दररोज स्नेहभोजनाची सुद्धा व्यवस्था येथील यजमान भूपेंद्र भाई पटेल परिवाराकडून करण्यात आली. या कथे दरम्यान अनेक उत्सव साजरे केले गेले. चरित्रातील सजीव देखाव्यात लहान मुलांपासून तर सर्वांनीच मोठ्या आनंदाने व हिरीरीने भाग घेतला. यामुळे तेथील लहान मुलांना सुद्धा श्रीराम चरित्रातील अनेक पात्रांचा परिचय झाला. भारतात असे उत्सव कायमस्वरूपी होत असतात परंतु अमेरिका सारख्या देशातही असा उत्सव साजरा होत असल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला. या कथेच्या माध्यमातून महाराजांनी आपला गृहस्थाश्रम धन्य कसा होईल, जीवनाचा खरा आनंद कसा मिळेल याबाबत मार्गदर्शन केले. आपली हिंदू संस्कृती व संस्कार आपण विसरता कामा नये. पुढील पिढीला सुद्धा हे संस्कार दिले गेले पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा महाराजांनी व्यक्त केली. उर्वरित वेळेत महाराजांनी अनेक भक्तांच्या घरी जाऊन भेट दिली.
परदेशातील या नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी तेथील रहिवासी ओमकार पटेल, हिरेन पटेल, कनुभाई लिंबानी, सुनीलभाई पटेल, प्रफुल्लभाई पटेल, रोशनभाई पटेल, किन्नरभाई पटेल, कल्पेश भिरुड, स्नेहल भिरूड, सचिन चौधरी, रूपाली चौधरी, तन्मय झोपे, नकुल ठोंबरे, लोकेश महाजन, दिव्या महाजन, कश्यप भाई पटेल, भूपेंद्रभाई पटेल, राजेश भाई पटेल, सुरेशभाई पटेल, मयांकभाई पटेल, रतिभाई पटेल केशवलालभाई पटेल, हितेन कुमार पटेल आदी बांधवांनी अपार मेहनत व सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या