Friday, September 18, 2026
Homeजळगावगुरुपौर्णिमेनिमित्त जनार्दन हरी जी महाराज यांच्या सत्संगाचे भव्य आयोजन

गुरुपौर्णिमेनिमित्त जनार्दन हरी जी महाराज यांच्या सत्संगाचे भव्य आयोजन

गुरुपौर्णिमेनिमित्त जनार्दन हरी जी महाराज यांच्या सत्संगाचे भव्य आयोजन

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
शेकडो वर्षापासून सुरु असलेली गुरु परंपरा अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज मोठ्या भक्तीभावाने व आनंदाने गुरुपौर्णिमेनिमित्त अविरतपणे साजरी करीत आहे. सतपंथ मंदिर संस्थान तथा श्री निष्कलंक धाम वढोदे फैजपूर येथे निसर्गरम्य वातावरणात सत्संगाचे आयोजन केले आहे.
गुरु पौर्णिमा महोत्सवासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात व परदेशातून हजारो भाविकांची उपस्थिती लाभत असते.
दि. २६ जुलै ते २८ जुलै सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत निष्कलंकी नारायण चरित्राचे पारायण (आगम चरित्र ) पठणाचा कार्यक्रम तसेच २९ जुलै रोजी सकाळी ५ वाजता कलश महापूजा व गुरुदिक्षा असा कार्यक्रम श्रीसतपंथ मंदिर येथे संपन्न होणार आहे. दि. २९ बुधवार या दिवशी गुरु पौर्णिमेनिमित्त सकाळी ९ वाजता सत्संग व ११ वाजेपासुन दर्शन व महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन वढोदे फैजपूर येथे करण्यात आले आहे.
सतपंथ संप्रदायाचे अनुयायी भारतातील
अनेक राज्यात व देश विदेशात असून मोठ्या संख्येने गुरुवचन श्रवण करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतात.
प पू जनार्दन महाराज सध्या विदेश प्रवासात सत्संग यात्रेत असून त्यांचे दिनांक २८ जुलै रोजी भारतात आगमन होणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या