Friday, September 18, 2026
Homeजळगावफैजपूरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष कलीमखान मनियार यांची जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी निवड

फैजपूरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष कलीमखान मनियार यांची जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी निवड

फैजपूरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष कलीमखान मनियार यांची जिल्हा काँग्रेस सरचिटणीसपदी निवड
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
फैजपूर नगरपरिषदेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा काँग्रेस गटनेते कलीमखान हैदरखान मनियार यांची जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व विभाग) च्या जिल्हा सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कलीमखान मनियार हे गेल्या सुमारे २५ वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय असून त्यांनी तीन वेळा नगरसेवक म्हणून नगरपरिषदेत प्रतिनिधित्व केले आहे. तसेच उपनगराध्यक्ष आणि प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा काँग्रेस (पूर्व विभाग) अध्यक्ष धनंजय चौधरी, नगरसेवक केतन किरंगे, शहराध्यक्ष शेख रियाज, माजी नगरसेवक मेहबूब पिंजारी, काँग्रेस गटनेते शेरू इरफान, नगरसेविका प्रियंका ताई, ईश्वर इंगळे, नगरसेवक हकीम तडवी, तसेच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या