जळगाव जिल्ह्यात SIRच्या कामात भुसावळची बाजी!
सर्वप्रथम काम पूर्ण केल्याबद्दल AERO किशोर वायकोळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
भुसावळ | खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी , दि. १०
जळगाव जिल्ह्यात विशेष पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्यामार्फत करण्यात येणारे काम सर्वप्रथम पूर्ण करण्याचा मान भुसावळ विभागाने पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भुसावळचे गटशिक्षणाधिकारी तथा AERO किशोर वायकोळे यांचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
SIR प्रक्रियेतील काम निर्धारित वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी वायकोळे यांनी BLO यांचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि नियमित पाठपुरावा केला. त्यामुळे भुसावळ विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करत जिल्ह्यात आघाडी घेतली.
नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा परिणाम
SIRसारख्या महत्त्वपूर्ण प्रशासकीय प्रक्रियेत वेळेचे नियोजन आणि प्रत्येक स्तरावर प्रभावी समन्वय आवश्यक असतो. भुसावळ विभागाने याच बाबींवर भर देत BLO यांच्या कामाचा सातत्याने आढावा घेतला. परिणामी, जिल्ह्यात सर्वप्रथम संबंधित काम पूर्ण करण्यात यश आले.
या कामगिरीची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी AERO किशोर वायकोळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. या यशामुळे भुसावळ तालुक्याची प्रशासकीय कार्यक्षमता अधोरेखित झाली असून, या प्रक्रियेत योगदान देणारे अधिकारी, कर्मचारी आणि BLO यांचेही कौतुक होत आहे.
“योग्य नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि टीमवर्कच्या जोरावर भुसावळने जिल्ह्यात सर्वप्रथम SIRचे काम पूर्ण केले,” अशी भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

