जागतिक ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भुसावळ येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण.
रेल कामगार सेनेच्या घोषणांनी रेल्वे परिसर दणाणला.
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
केंद्रीय अध्यक्ष विनायक राऊत,सरचिटणीस दिवाकर देव,कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या आदेशाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय दूर होण्यासाठी रेल कामगार सेनेतर्फे भुसावळातील डीआरएम कार्यालया बाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
भुसावळ येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डिआरएम कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर लावण्यात यावा,वेगवेगळ्या विभागात रेल्वे कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देण्यात यावा,तसेच जे एसएसई एकाच जागेवर चार वर्षापासून कार्यरत आहेत त्यांची बदली करण्यात यावी,रेल्वे रुग्णालयात त्वया रोग स्पेशालिस्ट व नाक,कान,घसा स्पेशालिस्ट डॉक्टर ची नियुक्ती करण्यात यावी,भुसावळात सोनोग्राफी चेक करण्यासाठी मोठ्या रुग्णालयास टायअप करावा,टीआरडी विभागातील कर्मचार्यांना जोखिम भत्ता देण्यात यावा,भुसावळ मधील सर्व विभागात पीएमसी सुरु करण्यात यावी,जे रेल्वे कर्मचारी चांगले व अती उत्कृष्ठ कार्य करत असतील त्यांना महाप्रबंधक पारितोषीक देण्यात यावा अशा विवीध मागण्यांचे निवेदन अप्पर मंडळ रेल प्रबंधक प्रविन कुमार पाठक यांना देण्यात आले.
या वेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा,मंडल सचिव राजेश लखोटे,कार्याध्यक्ष प्रितम टाक,कोषाध्यक्ष योगेश माळी,संयुक्त सचिव विनोद वाघे,उपाध्यक्ष अरविंद थोरात,पंकज ठाकरे, शांताराम सपकाळे,शेख शकील शेख सत्तार,प्रकाश करसाले,मोहन राजपूत,संतोष देशमुख,भरत शर्मा,सुरेश दरेकर,नितीन अमरोही,कमलाकर बाणाईत,रोहीत गायकवाड,अभिषेक गादेल्लू,सदानंद ब्राम्हणे,दीपक जोहरे,प्रमोद हिवरे,रमेश मराठे,रोषण तांबट,मुकेश महाजन,कृष्णा भोंडवे,गोपाल पाटील,तुषार जाधव,महेंद्र भोळे,दिपक जोहरे,अर्जुन फरहाटे,निरंजन राऊत,राजेश दुर्गना,रमेश मोटे,दिनेश सोनवणे,डी पी ढगे,एम के शहा,पूर्वेश सोनवणे,गणेश पाटील,शुभम तराले,पंकज पाटील,अजय नरवाडे,आय डी ठाकूर,सुरेश वानखेडे यांच्यासह रेल कामगार सेनेचे कार्यकर्ते व रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

