Thursday, August 13, 2026
Homeगुन्हाओझरखेडा येथे गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास अटक.

ओझरखेडा येथे गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास अटक.

ओझरखेडा येथे गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास अटक.
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
वरणगाव : ओझरखेडा ता . भुसावळ येथे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा व जीवंत काडतुस बाळगणाऱ्या एका तरुणास वरणगाव पोलीसांनी अटक केली असुन त्याचे जवळील मुद्देमाल जप्त केला आहे . या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओझरखेडा येथिल रोशन विकास पाटील वय. २६ या तरुणाजवळ बेकायदेशीर शस्त्र असल्याचा सुगावा पोलीसांना लागला होता. त्याआधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय मंगेश बेंडकोळी, सुधाकर शिंदे, प्रशांत ठाकुर, मनोज म्हस्के, ईश्वर तायडे, भूषण माळी, फिरोज पठाण यांच्या पथकाने सापळा रचून
संशयितास ताब्यात घेतले . त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडून गावठी कट्टा व एक जीवंत काडतूस जप्त केले. प्राथमिक चौकशीत त्याचेकडे शस्त्र बाळगण्यासंदर्भातील कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी त्याचे वर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या