Thursday, August 13, 2026
Homeजळगावपरम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या अवतरण दिनानिमित्त १५ ऑगस्ट...

परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या अवतरण दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी पाल वृंदावन धाम आश्रमात विविध कार्यक्रम

परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या अवतरण दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी पाल वृंदावन धाम आश्रमात विविध कार्यक्रम

पाल ता रावेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                रावेर तालुक्यातील श्री वृंदावन धाम पाल आश्रमाचे संस्थापक व अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे सदगुरु परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या 58 व्या अवतरण दिनानिमित्त दि. 15 ऑगस्ट रोजी पाल आश्रमाचे पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या मार्गदर्शनाने चैतन्य साधक परिवार समिती तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

 


सातपुड्यातून ज्ञान रुपी गंगा वाहून देशभरातील लाखो भाविकांचे भक्ती रुपी अमृताचा वर्षाव करीत त्यांच्या जिवनाचा उद्धार करणारे ब्रह्मलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे
१५ ऑगस्ट १९६८ साली पाल येथील सामान्य कुटुंबात अवतरीत झालेले परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांनी वयाच्या १४ व्या वर्षांपासून घर परिवाराचे त्याग करून पाल नजीक एका छोट्याश्या विरान टेकडीवर १९८२ साली येऊन अखंड ब्रम्हचर्य चे पालन करून भगवत भक्तीत नित्य लिन राहून भक्ती वैराग्य धारण केले. या वैराग्यातून पूज्य बापूजी यांनी १७ वर्षाचे निरंक उपवास आणि ४ वर्षापर्यंत मौन राहून साधना व अनुष्ठान केले ही साधना एवढी तीव्र झाली की याच्या बळावर परम पूज्य बापूजी यांना १६ नोव्हेंबर १९९६ या साली परम पिता परमेश्वर भगवान श्री कृष्णा चे साक्षात ज्योतिस्वरूप दर्शन घडले.त्यानंतर पूज्य बापूजीनी त्या दर्शनाला ६ महिन्यापर्यंत पटबंधातून निहारले. परमेश्वरी संकेत मधून पूज्य बापूजी यांनी २००० साली आपले अखंड उपवास व मौन विसर्जन करून २००२ या वर्षी माझ्या गोरगरीब सर्व प्रेमी समाजाला आध्यत्मिक ओढ निर्माण व्हावी आणि सर्व विकार त्यागून त्यांच्या जीवनाचे उद्धार होऊन कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता एक स्वतंत्र सूत्रात बांधून समानता निर्माण व्हावी या उद्धेश्याने अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराची स्थापना केली.हळू हळू आपल्या रसाळ अमृत वाणीतून सत्संग च्या माध्यमातून भक्तांना आध्यत्मिक उपदेश आणि मास,मदिरा, व सर्व विकाराचा त्याग करून शुद्ध सात्विक जीवन जगण्याचे मार्ग दाखवू लागले. याच

 

बरोबर पूज्य बापुजींनी श्री वृंदावन धाम आश्रम पाल हे श्रद्धास्थान बनवून यामध्ये अखंड हरीनाम संकीर्तन, वृद्धाश्रम, श्री हरी गोपाल गौशाळा, श्री हरी अध्यात्मिक साहित्य भांडार, निशुल्क आरोग्य केंद्र, सांधीपनी गुरुकुल, हर माह पौर्णिमा सत्संग, भोजनालय,राधाविहार, श्री हरिधाम मंदिर,अशी विविध सेवा आणि देशभरात दर महिन्याची भक्तीसभा व आठवड्याला ध्यान केंद्र आपल्या संकल्पनेतून निर्माण केले. या तून प्रेरित होऊन व पूज्य बापूजीच्या भक्ती प्रेमात तल्लीन होऊन देशभरातील लाखो चैतन्य साधक परिवार यांनी गुरुदिक्षा घेऊन शिष्यत्व प्रदान केले.परंतु वयाच्या ४३ व्या वर्षी नियतीच्या आदेशाचे पालन करीत २५ डिसेंबर २००९ साली पूज्य बापूजी ब्रम्हलींनात समाधीस्त झाले. त्यांच्या पच्यात पूज्य बापूजीचे कृपापात्र शिष्य विद्यमान गादीपती अखिल भारतीय संत समिती चे प्रदेश अध्यक्ष श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज व आश्रम समर्पित ब्रम्हचारी यांच्या सानिध्यात पूज्य बापूजी संकल्पित गतिविधी पाल आश्रमासाह,चारुकेश्वर, आंबा, कन्नड, हरसूद आश्रमात नित्य सुरु आहे.
पूज्य बापूजी यांच्या 58 व्या अवतरण दिनानिमित्त पाल वृंदावन धाम आश्रमात सकाळी श्री हरिधाम मंदिरात स्थित त्यांच्या समाधी स्थळी पूजन, आरती, अभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर 10 वाजेपासून हरीनामाच्या गजरात पाल गावात भक्ती फेरी काढण्यात येणार असून त्यानंतर सामूहिक प्रार्थना, गीतेचे पठन, व सत्संग, श्रद्धावचन, होऊन महाआरती करण्यात येणार आहे. तरी या महोत्सवाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे चैतन्य साधक परिवार वृंदावन धाम पाल समितीतर्फे आवाहन करण्यात आलेले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या