मराठा समाजाला सवलती मिळाव्यात, हीच आमची भूमिका : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मराठा समाजाला त्यांच्या मागण्यांनुसार योग्य त्या सवलती मिळाव्यात, हीच आमची भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळताना मनोज जरांगे-पाटील यांनी हे प्रकरण व्यवस्थित आणि संयमाने हाताळावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा दौऱ्यावर आले असता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भुसावळ येथील राधाकृष्ण हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध सामाजिक व राजकीय विषयांवर भाष्य केले.ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा पक्ष एनडीएसोबत आहे. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र, अनेक ठिकाणी अपेक्षित प्रमाणात सवलती मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्रातील विविध महामंडळांवर रिपाईच्या नेत्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत विचारले असता आठवले म्हणाले, “मराठा समाजाला त्यांच्या मागण्यांनुसार सवलती मिळाव्यात, हीच आमची भूमिका आहे. मात्र, हे प्रकरण योग्य पद्धतीने आणि संयमाने हाताळणे गरजेचे आहे.” कुणबी मराठा यातील काही विषय सरकार ने स्पष्ट करून आर्थिक निकषाने सव लती प्रदान कराव्यायावेळी रिपाई आठवले पक्षाचे राज्य उपाध्यक्ष काकासाहेब बंबाळकर, ज्येष्ठ नेते रमेश मकासरे, राजू सूर्यवंशी यांच्यासह विविध ठिकाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.