Friday, September 18, 2026
Homeजळगावजळगांव जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के रावेर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

जळगांव जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के रावेर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

जळगांव जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के रावेर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  खिर्डी प्रतिनिधी प्रवीण शेलोडे

जळगाव जिल्ह्यातील रावेर परिसराला मंगळवारी, दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, या भूकंपाची रिष्टर स्केलवर ३.३ इतकी तीव्रता नोंदविण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रावेर परिसर हा या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने जळगाव जिल्ह्यात जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप नोंद केंद्रावरही या भूकंपाची नोंद झाल्याच्या वृत्ताला जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोणतीही अधिकृत माहिती मिळाल्यास त्यानुसारच कार्यवाही करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या