Friday, September 4, 2026
Homeजळगावश्रीकृष्ण जयंतीला प्रसादरुपी कदंब तसेच पाहिजातकाचे झाड संगोपनासहित लावण्याचा संकल्प करावा. 

श्रीकृष्ण जयंतीला प्रसादरुपी कदंब तसेच पाहिजातकाचे झाड संगोपनासहित लावण्याचा संकल्प करावा. 

श्रीकृष्ण जयंतीला प्रसादरुपी कदंब तसेच पाहिजातकाचे झाड संगोपनासहित लावण्याचा संकल्प करावा.                     भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            डॉ.सुरेंद्रसिंग पाटील* 4 सप्टेंबर 2026 आपले आराध्यदैवत श्रीकृष्ण जयंती म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी सर्वांसाठी आनंदाचा क्षण हा सोहळा मोठ्या भक्ती भावाने श्रीकृष्ण मंदिरात तसेच देशातील सर्वच भागात घरोघर पाळणा बांधून गोपाळकाला करत रात्रभर जागरण करत विविध प्रकारचे भजने गात आनंदाने साजरा केला जातो. सद्यस्थितीत पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड जंगल क्षेत्रात तसेच निसर्गनिर्मित साधनसंपत्तीत होत असलेली घट यामुळे वातावरणात बदल होत मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होत असून आपणास चक्रीवादळ, भूकंप, ढगफुटी सदृश्य पाऊस त्यामुळे महापूर तसेच अनेक प्रकारचे दुर्धर आजार अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आपणास मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. आपले आराध्य दैवत द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण यांना कदंब वृक्ष अत्यंत प्रिय त्यांनी यमुनेच्या काठी वृंदावनात कदंब झाडांच्या वनात बासरी वाजवत अनेक लीला केल्या. कदंबाचे झाड कायमस्वरूपी हिरवेगार असते. पर्यावरणास अनुकूल असून त्याची फुले व फळे ही आयुर्वेदिक आहेत तसेच पारिजातकाचे झाड हे भगवान श्रीकृष्ण यांनी स्वर्गातून पृथ्वीवर आणले. पारिजातक म्हणजेच प्राजक्ता याला रात्री फुल येतात व सकाळी सूर्योदय होताना सर्व फुले गळून पडतात. पारिजातकाचे एकमेव फुल असं आहे की जे जमिनीवर पडल्यावर सुद्धा देवाला वाहता येते. पारिजातकाचा सुगंध अत्यंत मनमोहक असा आहे आयुर्वेदात खूप महत्त्वाचे आहे. पारिजातकाचे झाड घरासमोर अत्यंत शुभदायी मानले जाते पारिजातकाचे झाड ज्याच्या दारी तेथे येईल सुख समृद्धी असे म्हटले जाते. तरी आपण या जन्माष्टमीला आपले आराध्य दैवत भगवंताला प्रसादरूपात प्रिय असलेल्या दोन्ही झाडांचे संगोपनासहित वृक्षारोपण करण्याचा संकल्प करावा. याद्वारे आपले आदरणीय पंतप्रधान यांच्या ॔॔॔एक पेड माँ के लिये॓॓॓॓॓ अभियान 3 मध्ये सुद्धा आपला सहभाग होत आपल्या देशाच्या पर्यावरणास सुद्धा आपला हातभार लागेल. डॉ, सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या