Tuesday, September 8, 2026
Homeगुन्हागणेशोत्सवापूर्वी पोलिसांचा मोठा दणका; जिल्ह्यातील १४ जण हद्दपार

गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचा मोठा दणका; जिल्ह्यातील १४ जण हद्दपार

गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचा मोठा दणका; जिल्ह्यातील १४ जण हद्दपार

सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई; काहींना सहा महिने तर काहींना वर्षभर जिल्हाबंदी !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईचा वेग वाढवला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील १४ जणांना सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. याबाबतचे आदेश प्रांतअधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत.

या कारवाईत नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा, जामनेरमधील तीन, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन, तर रामानंद नगर, जिल्हापेठ आणि फत्तेपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.प्रशासनाच्या आदेशानुसार काही व्यक्तींना सहा महिन्यांसाठी, तर काहींना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये अरमान चिंधा पटेल, अक्रम शहा सादीक शहा, हरी पांडुरंग पाटील, विपुल गोविंदा नाथ, आवेश खान उर्फ काल्या शेख जहांगिर, मुक्तार शेहा खलील शहा, आताल्लाह शाह अमानल्लाह शाह आणि चेतन उर्फ बटाट्या रमेश सुशीर यांचा समावेश आहे.तर सहा महिन्यांसाठी जगन्नाथ रामकृष्ण कोळी, प्रकाश सुभाष शिंदे आणि सोपान अशोक इंगळे यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, या उद्देशाने पोलिसांकडून संशयित व सराईत व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या