Wednesday, September 9, 2026
Homeगुन्हाजामनेर भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा मोठा धक्का !

जामनेर भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा मोठा धक्का !

७०० रुपयांची लाच मागून २०० रुपये स्वीकारताना भूमापक रंगेहात पकडला!

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील नेरी बुद्रुक येथील एका ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला आपल्या शेताची मोजणी करावयाची होती. त्यासाठी त्यांना ‘स्किम पत्रक’ व ‘टिपण उतारा’ या शासकीय कागदपत्रांची आवश्यकता होती. त्यांनी या कागदपत्रांच्या साक्षांकित ( Attested ) प्रती मिळण्यासाठी ०२ सप्टेंबर २०२६ रोजी भूमी अभिलेख कार्यालय,जामनेर येथे रीतसर अर्ज केला होता.मात्र भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक (प्रतिलिपी – वर्ग ३) भगवान रोहिदास गायकवाड (वय ५१, रा. भुसावळ) यांनी या साक्षांकित प्रती देण्यासाठी शेतकऱ्याकडे ७०० रुपये लाचेची मागणी केली.शासकीय कामासाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने ०७ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जळगाव येथे जाऊन यासंदर्भात अधिकृत तक्रार नोंदवली.
पडताळणी आणि सापळा कारवाई
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने ०८ सप्टेंबर २०२६ रोजी उपअधीक्षक,भूमी अभिलेख कार्यालय,जामनेर येथे पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी (Verification) केली.या पडताळणीदरम्यान आरोपी लोकसेवक भगवान गायकवाड याने तडजोडीअंती २०० रुपये लाच मागून ती स्वीकारण्यास सहमती दर्शवली.त्यानंतर लगेचच एसीबी पथकाने कार्यालयात सापळा रचला. पंचांसमक्ष आरोपी भगवान गायकवाड याने २०० रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
आरोपीचा जुना गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी भगवान रोहिदास गायकवाड याच्या विरुद्ध यापूर्वीही लाच स्वीकारल्याप्रकरणी सन २०१२ मध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ येथे गुन्हा दाखल झालेला आहे.लाचखोरीच्या प्रकरणात त्याच्यावर झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
कायदेशीर कारवाईचा तपशील –
आरोपीचे नाव: भगवान रोहिदास गायकवाड (वय ५१ वर्ष, व्यवसाय: नोकरी – भूमापक [प्रतिलिपी], वर्ग-३, रा. भुसावळ)गुन्हा नोंद: जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा(Prevention of Corruption Act) कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ताब्यात: आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील अटकेची कारवाई सुरू आहे.कारवाई करणारे अधिकारी व पथक:सापळा अधिकारी: श्री. हेमंत नागरे (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगाव) पर्यवेक्षक अधिकारी योगेश ठाकूर ( पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.जळगाव ) सापळा पथक पोहवा बाळू मराठे, पोकॉ प्रणेश ठाकूर, पोकॉ सचिन चाटे मार्गदर्शन भारत तांगडे (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र) प्रदीप मैराळे (अप्पर पोलीस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्र)
श्रीम. कविता फडतरे (अप्पर पोलीस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्र)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन:
कोणत्याही सरकारी कामासाठी अथवा सेवेसाठी लोकसेवक (शासकीय अधिकारी/कर्मचारी) लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.टोल फ्री / व्हॉट्सॲप क्रमांक: 1064 / 7588661064 / 9545031064 जळगाव कार्यालय संपर्क: 0257-2235477 ई-मेल: dyspacbjalgaon@gmail.com
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या